Join us  

नफा वाढला, गुंतवणूकदार मालामाल; ऑटो, रिअल्टी, हॉस्पिटॅलिटीची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 8:12 AM

युरोप आणि अमेरिका या विकसित बाजारांतील मंदीचा भारतीय आयटी क्षेत्रावर अल्प प्रमाणात परिणाम दिसून आला.

नवी दिल्ली - चालू वित्त वर्षातील डिसेंबरच्या तिमाहीत वाहन, घर बांधणी, बँक, ऊर्जा आणि अतिथ्य या क्षेत्रातील नफा २० टक्क्यांनी वाढला आहे. देशांतर्गत औद्योगिक क्षेत्राच्या सरासरी कामगिरीच्या तुलनेत हा नफा खूपच चांगला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांनाही चांगला परतावा मिळाला आहे.

बेस इफेक्टमुळे विक्री-नफ्यात अंतरबँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, विक्री आणि नफ्यात दिसणाऱ्या मोठ्या अंतरामागे ‘बेस इफेक्ट’ हे कारण आहे. वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये विक्री व नफ्यात घट झाली होती. त्यामुळे २०२१-२२ मध्ये आकड्यांतील थोडीशी वाढही टक्केवारीमध्ये मोठी दिसून येत आहे.

गृहकर्जाची मागणी वाढलीबँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले की, रिअल इस्टेट कंपन्यांची विक्री आणि नफा दोन्हींतही वाढ झाली आहे. स्वस्त आणि महागड्या घरांची विक्री समान वाढल्यामुळे गृहकर्जाची मागणी वाढली. त्याचा बँकांनाही लाभ झाला.

मंदीचा आयटीवर अल्पसा परिणामयुरोप आणि अमेरिका या विकसित बाजारांतील मंदीचा भारतीय आयटी क्षेत्रावर अल्प प्रमाणात परिणाम दिसून आला. तिसऱ्या तिमाहीत आयटी कंपन्यांची विक्री १९.३% वाढली. आदल्या वर्षी ही वाढ २३.३% होती.