नवी दिल्ली : स्वीडनची दूरसंचार क्षेत्रातील एरिक्सन ही कंपनी पुण्यात सुरुवातीला ९९ ते १३२ कोटी रुपयांची गुंतवणूक करून दुसरा कारखाना उभारणार आहे. एरिक्सनचा हा नियोजित कारखाना पुढच्या वर्षी जून-जुलैपर्यंत सुरू होईल. नंतर या कारखान्याचे रूपांतर कंपनीचे निर्यात केंद्र म्हणून केले जाईल.
एरिक्सनच्या पुण्यातील या नियोजित कारखान्यात दूरसंचार उपकरणे तयार केले जातील. ही उपकरणे १८० देशांत निर्यात केली जाणार आहेत. या कंपनीचा जयपूर येथे आधीच एक कारखाना आहे; परंतु याचा उपयोग फक्त भारतीय बाजारपेठेसाठी केला जातो.
पुण्यातील कारख्यान्यासाठी सुरुवातीला १.५ ते २.०० कोटी डॉलरची गुंतवणूक केली जाईल. भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या येत्या काही वर्षात दुप्पट करण्यात येणार आहे, असे एरिक्सनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हंस वेस्टबर्ग यांनी सांगितले. मोबाईल नेटवर्कशिवाय एरिक्सनचा आयपी नेटवर्क, क्लाऊड, टीव्ही आणि मीडियाचा समावेश करण्यासाठी संशोधन आणि विकास कार्यक्रमावर भर असेल, असेही ते म्हणाले.
एरिक्सन उभारणार पुण्यात प्रकल्प
स्वीडनची दूरसंचार क्षेत्रातील एरिक्सन ही कंपनी पुण्यात सुरुवातीला ९९ ते १३२ कोटी रुपयांची गुंतवणूक करून दुसरा कारखाना उभारणार आहे.
By admin | Published: September 2, 2015 11:11 PM2015-09-02T23:11:34+5:302015-09-02T23:11:34+5:30