Join us

गुजरातेतील जनरल मोटर्सचा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय लांबणीवर

By admin | Published: April 29, 2017 12:26 AM

गुजरातच्या हालोल येथील जनरल मोटर्सचा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला.

नवी दिल्ली : गुजरातच्या हालोल येथील जनरल मोटर्सचा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. सेडान श्रेणीतील क्रुझ आणि कॉम्पॅक्ट स्पोर्ट युटिलिटी श्रेणीतील तवेरा या गाड्यांचे उत्पादन या प्रकल्पात होते. प्रकल्प बंद करण्यासाठी येणार असलेला अफाट खर्च, न्यायालयात दाखल झालेल्या याचिका आणि चिनी भागीदार कंपनीला प्रकल्प विकण्याच्या मार्गातील अडथळे यामुळे कंपनी हा प्रकल्प बंद करू शकली नाही.हा प्रकल्प शुक्रवारी बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आज तेथे नेमके काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष होते. तथापि, कंपनीला प्रकल्प बंद करणे शक्य झाले नाही. हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुजरात सरकारने १९९६ साली कंपनीला १७२ एकर जमीन दिली होती. ही जमीन परत घेण्याचे सरकारने मान्य केले होते. तथापि, त्यासाठी कंपनीने सरकारला बाजारभावाप्रमाणे जमिनीचे पैसे द्यावेत, असा प्रस्ताव सरकारने ठेवला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)तळेगाव प्रकल्पाचा करायचा होता विस्तारजनरल मोटर्समध्ये ९00 कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गुजरात कामदार मंडळाचे सरचिटणीस निहिल मेहता यांनी सांगितले की, प्रकल्प बंद करण्याची परवानगी कंपनीला देण्यात आलेली नव्हती. राज्य सरकारने कंपनीला तसे स्पष्ट संकेत दिले होते. कंपनीला इथला प्रकल्प बंद करून पुण्याजवळील तळेगावचा प्रकल्प विस्तारित करायचा होता. २00 कामगारांची त्यांनी तळेगावला बदलीही केली होती. मात्र केवळ ३0 सुपरवाइझरच बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. १२ कामगारांना कंपनीने स्वेच्छा निवृत्ती देऊ केली होती.