मुंबई : देशातील सर्व भागधारकांच्या शेअर्सवर नियंत्रण ठेवणा-या नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) अफोर्डेबल हाउसिंगसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आर्किटेक्ट्स आणि बांधकाम अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
सन २०२२ पर्यंत देशात प्रत्येकाला घर मिळण्यासाठी केंद्र सरकारने ‘अफोर्डेबल हाउसिंग’चा कार्यक्रम हाती घेतला आहे. याच उपक्रमाला अधिक बळ मिळण्यासाठी आर्किटेक्ट्स व बांधकाम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाºया विद्यार्थिनींना प्रोत्साहित करण्यासाठी एनएसडीएलने टाटा हाउसिंगच्या सहकार्याने विशेष शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत खास सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई. अथवा बी.टेक., बी.आर्च (आर्किटेक्ट) आणि बांधकाम व्यावसाय क्षेत्रात एमबीए करणाºया विद्यार्थिनींनी निवड केली जाणार आहे.
बी.ई. अथवा बी.टेक.च्या विद्यार्थिनींनी आर्किटेक्चर हा विषय निवडलेला असावा आणि शालांत परीक्षेनंतर पुढे दरवर्षी किमान
५० टक्के गुण प्राप्त केलेले असावे, एमबीएच्या विद्यार्थिनींनी पदवी अभ्यासक्रमात किमान ५० टक्के गुण मिळवलेले असावेत, अशा त्यासाठी अटी आहेत. अर्ज १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून, १५ मार्चला शिष्यवृत्ती वितरित होणार आहे.
>विद्यासारथी फाउंडेशन
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने विद्यार्थी केंद्रित कार्यासाठी ‘विद्यासारथी’ फाउंडेशन सुरू केले आहे. एनएसडीएलच्या या देशातील अशा पहिल्या उपक्रमालाही या फाउंडेशनचे बळ आहे. टाटा हाउंसिंगचे सीईओ ब्रोटिन बॅनर्जी व एनएसडीएलचे सीईओ गगन राय यांच्या उपस्थितीत हा शिष्यवृत्ती कार्यक्रम घोषित झाला.
होतकरू आर्किटेक्ट्ससाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहन
देशातील सर्व भागधारकांच्या शेअर्सवर नियंत्रण ठेवणा-या नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) अफोर्डेबल हाउसिंगसाठी पुढाकार घेतला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:13 AM2018-02-06T00:13:52+5:302018-02-06T00:13:56+5:30