Lokmat Money > बिझनेस न्यूज > मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर काय करायचे? डुप्लिकेट डॉक्युमेंट कशी मिळवायची? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर

मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर काय करायचे? डुप्लिकेट डॉक्युमेंट कशी मिळवायची? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर

Property Documents : मालमत्तेची कागदपत्रे कोणत्याही कारणाने हरवली तर काय करावं? याविषयी सविस्तर जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:57 AM2023-04-26T11:57:06+5:302023-04-26T11:57:41+5:30

Property Documents : मालमत्तेची कागदपत्रे कोणत्याही कारणाने हरवली तर काय करावं? याविषयी सविस्तर जाणून घ्या....

property if lost your property document how to apply for duplicate papers know what to do if registry papers lost | मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर काय करायचे? डुप्लिकेट डॉक्युमेंट कशी मिळवायची? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर

मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर काय करायचे? डुप्लिकेट डॉक्युमेंट कशी मिळवायची? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : मालमत्तेच्या बाबतीत प्रत्येकजण खूप सावध असतो. पण असे असतानाही काही वेळा काही समस्या निर्माण होतात. मालमत्तेची कागदपत्रे (Property Documents)  सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँक लॉकरचा अवलंब करतात. ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात, कारण त्याशिवाय तुम्ही भविष्यात तुमची मालमत्ता विकू शकणार नाही. 

ही कागदपत्रे फक्त तुम्हीच या मालमत्तेचे खरे मालक आहात आणि त्यावर तुमचा कायदेशीर अधिकार आहे, हे दाखवतात. पण ही कागदपत्रे कुठेतरी हरवली किंवा तुम्ही ती कुठेतरी ठेवून विसरुन गेला तर काय? तर दुसरा कोणीतरी याचा गैरफायदा घेऊन तुमच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग मालमत्तेची कागदपत्रे कोणत्याही कारणाने हरवली तर काय करावं? याविषयी सविस्तर जाणून घ्या....

सर्वात आधी एफआयआर दाखल करा
अशा प्रकरणांमध्ये सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवावा लागेल. तुमचे पेपर्स कुठेतरी हरवले आहेत, हे पोलिसांना सांगावे लागेल. तसेच तुम्ही कुठेतरी ठेवून विसरला असाल आणि आता ते मिळणे अशक्य असेल तरीही एफआयआर दाखल करावा लागेल. एफआयआर दाखल केल्यानंतर त्याची एक प्रतही आपल्याकडे ठेवावी लागेल. शक्य असल्यास, ही माहिती इंस्‍पेक्‍टर जनरल ऑफ रजिस्‍ट्रेशन किंवा सब रजिस्ट्रार यांनाही लेखी स्वरूपात देखील दिली जाऊ शकते. या लेखी माहितीमध्ये कागदपत्रांसंबधी परिस्थिती कशी निर्माण झाली हे नक्की सांगा, जेणेकरून त्यांना समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजेल. याशिवाय, वर्तमानपत्रात नोटीसही प्रसिद्ध करावी.

कायदेशीर मार्ग वापरा
मालमत्तेच्या कागदासाठी, स्टॅम्प पेपरवर एक अंडरटेकिंग काढा, ज्यामध्ये मालमत्तेची संपूर्ण माहिती असेल. त्यात हरवलेली कागदपत्रे, एफआयआर आणि वृत्तपत्रातील नोटिसांचा उल्लेख असावा. हे अंडरटेकिंग नोटरीकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यानंतर ते रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जमा करावे लागेल. तुम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असल्यास, तुम्ही रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन किंवा RWA कडून डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मिळवू शकता.

प्रॉपर्टीचे डुप्लिकेट कादगपत्रे घ्या
आता तुमच्या मालमत्तेच्या डुप्लिकेट पेपरसाठी तुम्हाला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये डुप्लिकेट सेल डीडसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला एफआयआरची फोटोकॉपी, वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीची कॉपी, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट आणि नोटरीने अटेस्टेड केलेले अंडरटेकिंग आणि काही प्रोसेसिंग फीस रजिस्ट्रार ऑफिस जमा करावी लागेल. त्यानंतर तुमच्या नावावर डुप्लिकेट सेल डीड जारी केली जाईल.

Web Title: property if lost your property document how to apply for duplicate papers know what to do if registry papers lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.