Join us

४५ लाखांपेक्षा कमी दर? ग्राहकांना नको स्वस्त घरं, मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत २२ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:07 AM

४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये २२ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

देशातील आठ प्रमुुख शहरांमध्ये २०२४ च्या जानेवारी ते मार्च तिमाहीत घरांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. ४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये २२ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. घरांची विक्री करणाऱ्या प्रॉपटाइगर.कॉम या कंपनीने दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 

मागील वर्षी याच समान कालावधीत एकूण झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये परवडणाऱ्या घरांचा वाटा ४८ टक्के इतका होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या कालखंडात एकूण १,२०,६४० घरांची  विक्री झाली. मागील वर्षी याच समान कालावधीत एकूण ८५,८४० घरांची विक्री करण्यात आली होती. एकूण विक्रीमध्ये ४१ टक्के इतकी वाढ झाली आहे.  

२५ लाखांपेक्षा स्वस्त घरांच्या मागणीत घट 

  • जानेवारी ते मार्च या काळात विकल्या गेलेल्या एकूण घरांमध्ये किंमत २५ लाखांपेक्षा कमी असलेल्या घरांचे प्रमाण केवळ ५ टक्के इतके होते. 
  • चालू वर्षात जानेवारी ते मार्च या काळात २५ ते ४५ लाखदरम्यान किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचे प्रमाण १७ टक्के इतके होते. मागील वर्षी याच समान कालावधीत या श्रेणीतील घरांचा वाटा एकूण विक्रीमध्ये २३ टक्के इतका होता.
टॅग्स :व्यवसाय