Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्रीसकडून युरोझोनला अखेर प्रस्ताव

ग्रीसकडून युरोझोनला अखेर प्रस्ताव

ग्रीसने अत्यंत बिघडलेली आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व एकच चलन असलेल्या क्षेत्रात राहण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून युरो क्षेत्राला नवा सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे.

By admin | Published: July 10, 2015 11:09 PM2015-07-10T23:09:34+5:302015-07-10T23:09:34+5:30

ग्रीसने अत्यंत बिघडलेली आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व एकच चलन असलेल्या क्षेत्रात राहण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून युरो क्षेत्राला नवा सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे.

The proposal from Greece to the euro zone | ग्रीसकडून युरोझोनला अखेर प्रस्ताव

ग्रीसकडून युरोझोनला अखेर प्रस्ताव

ब्रुसेल्स : ग्रीसने अत्यंत बिघडलेली आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व एकच चलन असलेल्या क्षेत्रात राहण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून युरो क्षेत्राला नवा सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ग्रीसच्या दिवाळखोर आर्थिक परिस्थितीने जगासमोर गंभीर संकट उभे केल्यानंतर ग्रीसने मुदत संपायला दोन तास शिल्लक असताना ही योजना सादर केली. युरो क्षेत्राचे अधिकारी येत्या रविवारी २८ युरोपीय नेत्यांच्या निर्णायक संमेलनाच्या आधी योजनेच्या तपशिलाचा अभ्यास करतील. कर्ज देणाऱ्या देशांचे म्हणणे असे आहे की, या योजनेमध्ये निवृत्तीवेतन आणि करांमध्ये सुधारणांचा समावेश अवश्य असला पाहिजे.
युरो क्षेत्रातील अर्थमंत्र्यांचे मुख्य प्रवक्ते मिशेल रेन्स म्हणाले की, ‘ग्रीसचा प्रस्ताव युरो समूहाचे अध्यक्ष डिज्सेल्ब्लोम यांना मिळाला. कर्ज देणाऱ्यांसाठी त्यांचे त्याबद्दलचे आकलन खूप महत्त्वाचे आहे.’ ग्रीसच्या डाव्या विचारांच्या सरकारचे पंतप्रधान एलेक्सिस सिप्रास यांचा सगळा दिवस अथेन्समध्ये ही योजना तयार करण्यात गेला. ग्रीसचा हा प्रस्ताव विशेषत: जर्मनीला पसंत पडला पाहिजे. कारण जर्मनीकडूनच त्याला अब्जावधी डॉलरचे कर्ज मिळणार आहे.

Web Title: The proposal from Greece to the euro zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.