वॉशिंग्टन : आगामी दोन वर्षांत म्हणजेच २०२० किंवा २०२१ मध्ये मोठी आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे, असे मत अमेरिकेतील बहुतांश अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे.
नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिस्ट (एनएबीई) या संस्थेने हे सर्वेक्षण जारी केले आहे. फेब्रुवारीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत ताज्या सर्वेक्षणात फारच थोड्या अर्थतज्ज्ञांना यंदाच मंदी सुरू होईल, असे वाटते. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोत्साहन पॅकेजसाठी फेडरल रिझर्व्हवर सातत्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे ‘फेड’ने ३१ जुलै रोजी व्याजदरात कपात केली.
सन २०१८ मधील व्याजदरातील वाढ मागे घेण्याचे संकेतही ‘फेड’कडून दिले जात आहेत. त्यामुळे यंदाच मंदीचा फटका बसणार नाही, असे तज्ज्ञांना वाटते.
एनएबीईचे अध्यक्ष कॉन्स्टेन्स हंटर यांनी सांगितले की, पतधोरणातील बदलामुळे यंदा वृद्धी विस्तारित होईल, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उत्तरदात्यांना वाटते. २२६ उत्तरदात्यांतील केवळ २ टक्के उत्तरदात्यांनाच मंदी यंदा सुरू
होईल, असे वाटते. फेब्रुवारीतील सर्वेक्षणात १० टक्के उत्तरदात्यांनी यंदाच मंदी सुरू होईल, असे भाकीत केले होते. (वृत्तसंस्था)
अमेरिका-चीन व्यापारी युद्धाचा परिणाम
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी युद्धासह अनेक बाबी लक्षात घेऊन अर्थतज्ज्ञ मंदीबाबत बोलत आहेत. तरीही मंदी २०२० मध्ये धडकेल की, २०२१ मध्ये याबाबत मात्र तज्ज्ञांत मतभेद आहेत. हंटर यांनी सर्वेक्षण गोशवाऱ्यात म्हटले की, ३८ टक्के तज्ज्ञ मानतात की, पुढील वर्षीच मंदी येईल. ३४ टक्के तज्ज्ञांना मात्र आणखी एक वर्षानंतर मंदी येईल, असे वाटते. यावेळी २०२१ मध्ये मंदीचे भाकीत करणाºया तज्ज्ञांची संख्या बरीच वाढली आहे. आधीच्या अहवालात बहुतांश तज्ज्ञ पुढील वर्षी मंदी येईल, असे म्हणत होते.
अमेरिकेत आगामी दोन वर्षांत आर्थिक मंदीची शक्यता
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी युद्धासह अनेक बाबी लक्षात घेऊन अर्थतज्ज्ञ मंदीबाबत बोलत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:58 AM2019-08-20T00:58:37+5:302019-08-20T00:58:54+5:30