बंगळुरू/मुंबई : आयटी क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी ‘कॉग्निझंट’कडून मोठ्या नोकरकपातीची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने खर्चकपातीच्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून, नोकरकपात हा त्यातील एक पर्याय आहे.कॉग्निझंटचे नवे सीईओ ब्रियान हम्फायरीस यांनी वृद्धीला चालना देणे आणि खर्च कमी करणे यासाठी मोठी पुनर्रचना हाती घेतली आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीचा वेतनातील ‘व्हेरिएबल पे’ हा घटक वाढविण्यावर विचार सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, कॉग्निझंटने कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनाची नवी पद्धती सुरू केली. कमकुवत कामगिरी असलेल्या वा प्रकल्प न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना बाजूला काढले जाईल. त्यांची संख्या मोठी असेल. आठ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या कर्मचाºयांना यात लक्ष्य केले जाईल.कॉग्निझंटचा एक अधिकारी म्हणाला की, नारळ देण्यात येणाºया कर्मचाºयांची संख्या किती असावी, याचे मूल्यमापन केले जात आहे. तिमाहीतील वृद्धीवर ते अवलंबून असेल. खर्चकपातीसाठी बिनमहत्त्वाचा प्रवास बंद केला आहे.या वर्षाच्या सुरुवातीला कॉग्निझंटने आपल्या वृद्धीदर अंदाजात कपात केली होती. अतिरिक्त कर्मचाºयांमुळे महसूल कमी झाल्याचे व त्यातून नफ्यात घट झाल्याचे कंपनीने म्हटले होते. (वृत्तसंस्था)‘कॅम्पस हायरिंग’ लांबणीवर पडणारयंदा कंपन्यांचे ‘कॅम्पस हायरिंग’ लांबणीवर पडू शकते. अमेरिकेच्या न्यू जर्सी प्रांतातील टिनेक कंपनीने नव्या कर्मचाºयांना आॅफर लेटर देणे व रुजू होण्याच्या तारखा यातील कालावधी वाढविला आहे. खर्चकपात हे यामागील कारण आहे.
कॉग्निझंटमध्ये खर्च कमी करण्यासाठी आणखी नोकरकपातीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 3:35 AM