Join us  

रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे रक्षण व्हावे

By admin | Published: July 28, 2016 1:27 AM

रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण व्हायला हवे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी दहाव्या सांख्यिकी दिनाचे आयोजन

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण व्हायला हवे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी दहाव्या सांख्यिकी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजन बोलत होते. राजन यांनी टीकाकारांचा जोरदार समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या उच्च व्याजदरांमुळे वृद्धी संपली आहे, अशी टीका होत असतानाच भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी प्राप्त करणारा देश ठरला असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो.‘ही दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत. रिझर्व्ह बँकेच्या धोरणांनी नव्हे, तर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती घसरल्यामुळे महागाई कमी झाल्याचा दावा केला जात आहे. तथापि, या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. जागतिक बाजारात तेलाच्या किमती घसरल्या तरी सरकारने कर वाढविल्यामुळे स्वस्ताईचा मोठा हिस्सा ग्राहकांपर्यंत पोहोचलेलाच नाही,’ असेही राजन म्हणाले. (वृत्तसंस्था)