नवी दिल्ली : एअर इंडियाचे खाजगीकरण करताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही एअर इंडियाचे प्रमुख अश्वनी लोहानी यांनी दिली आहे. एअर इंडियातील निर्गुंतवणुकीला कर्मचारी संघटनांनी विरोध चालविला असून, त्याविरुद्ध आंदोलन करण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर लोहानी यांनी कर्मचाºयांच्या नावे एक निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकार पुढील महिन्यात निविदा मागविणार असल्याचे समजते. आमचे थकीत वेतन व निवृत्तीवेतनाचे काय, असा प्रश्न उपस्थित करून कर्मचाºयांनी बुधवारी आंदोलनाचा इशारा दिला होता.
लोहानी म्हटले की, एअर इंडिया संपूर्ण जगात एक मान्यवर भारतीय ब्रँड आहे. सध्याच्या कसोटीच्या काळातही या ब्रँडची चमक कायम राखणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे.