नवी दिल्ली : एअर इंडिया आणि स्टार अलायन्सच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी नवी दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात स्टार अलायन्सचा २० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. जगातील २० एअरलाईन्स कंपन्या स्टार अलायन्सच्या सदस्य आहेत आणि भारतीय उपखंडात फक्त एअर इंडिया हीच एकमेव कंपनी तिची सदस्य आहे.या कार्यक्रमात एअर इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंग खारोला यांनी स्टार अलायन्सचे सीईओ जेफ्री गोहँड यांचे स्वागत केले. स्टार अलायन्स या प्रतिष्ठित समूहाचा सदस्य असल्याचा एअर इंडियाला मोठा अभिमान आहे, असे खारोला म्हणाले. एअर इंडिया आणि स्टार अलायन्सची दिवसेंदिवस अधिक भरभराट होेत राहील आणि जगातील प्रवाशांची अशीच सेवा करीत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अलायन्सला पाठिंबा दिल्याबद्दल आणि अलायन्सने जाळे अधिक विस्तारित करण्यात सक्रिय भूमिका बजावल्याबद्दल गोहँड यांनी एअर इंडियाचे आभार मानले. यावेळी खारोला आणि गोहँड यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी गोहँड यांनी खारोला यांना स्टार अलायन्सचे स्मृतिचिन्ह अंकित असलेले विमानाचे मॉडेल भेट दिले.१९९७ मध्ये स्टार अलायन्सची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत या अलायन्सला अनेक जागतिक कीर्तीचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात बिझनेस ट्रॅव्हलर मॅगझिन आणि स्कायट्रॅक्सतर्फे दिला जाणारा एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड मार्केट लीडरशिप अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट एअरलाईन अकार्डचा समावेश आहे. स्टार अलायन्स सध्या १९१ पेक्षा जास्त देशांमधील १३०० विमानतळांवरून दररोज किमान १८,४०० विमानांचे उड्डाण संचालित करते.>अशीच भरभराट होईलएअर इंडिया आणि स्टार अलायन्सची दिवसेंदिवस अधिक भरभराट होेत राहील आणि जगातील प्रवाशांची अशीच सेवा करीत राहील, असा विश्वास खारोला यांनी व्यक्त केला.
‘स्टार अलायन्सच्या सदस्यत्वाचा अभिमान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 4:17 AM