ग्रीन सिटीच्या चाव्या प्रदान
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
वाणिज्य बातमी .. १० बाय ३ ...फोटो आहे.. रॅपमध्ये ...कॅप्शन : ग्रीन स्पेस इन्फ्राच्या ग्रीन सिटी एकीकृत टाऊनशिपमधील इमारती.- २७१ कुटुंबीयांना फ्लॅटचा ताबा : टाऊनशिपमध्ये आधुनिक सोयीनागपूर : ग्रीन स्पेस इन्फ्रातर्फे नवनिर्मित ग्रीन सिटी टाऊनशिपच्या पहिल्या टप्प्यातील २७१ फ्लॅटच्या चाव्या रविवारी विशेष समारंभात ग्राहकांना देण्यात आल्या. याप्रसंगी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. कंपनीच्या संचालकांनी सांगितले की, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा देण्यात आला. यावेळी विशेष अतिथी म्हणून स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक शंकर, एलआयसीचे फायनान्स प्रमुख सुहास पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिंगणे, सरपंच गुणवंत दंडाडे, उपसरपंच गुणवंत वानखेडे हजर होते.कार्यक्रमात एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून कंपनीवर विश्वास दाखविला. टाऊनशिपमध्ये फ्लॅटसह विविध सोयीसुविधा तयार आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये आकर्षण वाढले आहे. नयनरम्य गार्डन आणि भव्य फाऊंटेन तयार आहे. ही टाऊनशिप घोगली-शंकरपूर रोडस्थित पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसमोर आहे.दुसऱ्या टप्प्याचे निर्माण कार्य सुरू झाले असून भव्य ऑफर सुरू आहे. बुकिंगसाठी लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. घरी खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांनी साईटवर एकदा भेट द्यावी, असे आवाहन संचालकांनी केले आहे. बुकिंग महोत्सव मानेवाडा रोड, सिद्धेश्वर सभागृहाजवळ सुरू आहे. मांडविया समूहाचा हा प्रकल्प पूर्णत: नासुप्रतर्फे मंजूर आहे. एकीकृत टाऊनशिपमध्ये मंदिर, जॉगिंग ट्रॅक, वरिष्ठ नागरिकांसाठी पार्क, चिल्ड्रेन पार्क, क्लब हाऊस, योगा रूम, खेळांसाठी जागा, पार्टी हॉल व लॉन, गेस्ट हाऊस तयार आहे.