मुंबई : तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी केंद्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला उपस्थित होत्या.
गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या राज्यांचा अभ्यास करून मोठ्या गटांच्या राज्यात महाराष्ट्राची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०१५ मध्ये तेल व वायू संवर्धन पंधरवड्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधे तेल व वायू संवर्धनाच्या दिशेने कामास सुरुवात झाली. तेल व वायू संवर्धनाबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमधे जनजागृती करण्यासाठी १,०२२ शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांमधे इंधन वापर व तेल तसेच वायू संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी ४२० शिबिरे आयोजित करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
तेल व वायू संवर्धनासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार प्रदान
तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी केंद्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला.
By admin | Published: January 19, 2016 03:11 AM2016-01-19T03:11:50+5:302016-01-19T03:11:50+5:30