नवी दिल्ली : साखर उद्योगाच्या सकल विकासासाठी २०१५-१६ च्या हंगामात शेतकऱ्यांना ऊस उत्पादन आधारित सबसिडी देण्याचा अन्न मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. प्रति क्विंटल २३० रुपयांपैकी शेतकऱ्यांना ४७.५० रुपये उत्पादन आधारित सबसिडी म्हणून देण्याचे या नवीन प्रणालीत प्रस्तावित आहे.
अन्न मंत्रालयाने या संदर्भात मंत्रिमंडळासाठी प्रस्तावाचा मसुदा जारी केला असून त्यावर अभिप्राय मागविण्यासाठी विविध मंत्रालयांकडे हा मसुदा पाठविण्यात आला आहे.
सध्या केंद्र सरकार उसासाठी दरवर्षी एफआरपी घोषित करते आणि साखर कारखाने उसाचे देयक चुकते करतात. चालू हंगामासाठी (आॅक्टोबर-सप्टेंबर) एफआरपी (योग्य आणि वाजवी दर) प्रति क्विंटल २३० रुपये निश्चित केले आहे.
साखर उद्योग क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी चालू हंगामात ऊस उत्पादन आधारित शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा अन्न मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. यातहत एफआरपीचा एक हिस्सा शेतकऱ्यांना थेट दिला जाईल. एकूण सबसिडीचा आकडा १,२५० कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. ही सबसिडी साखर विकास निधीतून दिली जाईल. सबसिडीची रक्कम साखर कारखान्यांनी उघडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
जागतिक व्यापार संघटनेत काही देशांनी आक्षेप घेतल्याने निर्यातदारांऐवजी ऊस उत्पादकांना सबसिडी देण्याचा अन्न मंत्रालयाचा प्रस्ताव आहे.
ऊस उत्पादकांना देणार सबसिडी
साखर उद्योगाच्या सकल विकासासाठी २०१५-१६ च्या हंगामात शेतकऱ्यांना ऊस उत्पादन आधारित सबसिडी देण्याचा अन्न मंत्रालयाचा प्रस्ताव आहे
By admin | Published: October 28, 2015 09:53 PM2015-10-28T21:53:07+5:302015-10-28T21:53:07+5:30