Join us  

प् ार्वणीच्या फेरनियोजनात तात्पुरता दिलासा

By admin | Published: September 03, 2015 11:52 PM

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या कडेकोट बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणार्‍या दुसर्‍या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक व्यवस्था व शहरवासीयांचे हाल कमी करण्यासाठी फेरनियोजन करण्याचे प्रशासनाने ठरविले. मात्र नाशिकरोडला येणार्‍या भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्याचे व शहरांतर्गत काही रस्त्यांवर बस वाहतूक सुरू ठेवण्याचे तात्पुरते पर्याय सुचविण्यात आले आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आली. १२ व १३ सप्टेंबर रोजी अमावास्या असल्याने दोन दिवस भाविकांची स्नानासाठी गर्दी होईल असा अंदाज असला तरी, १२ रोजी पोळा सण व सध्या दुष्काळाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील भाविक येण्याची शक्यता कमी आहे; परंतु परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील, असे या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रकारच्या सूचना तसेच काही तक्रारीही केल्या त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
-----
...तर साधू-महंतांचे शाहीस्नानावर बहिष्कार
पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्‍या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. या नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन भाविकांसाठी सुरक्षा होती की, कर्फ्यु होता हेच कळले नसल्याचे त्यांनी सांगितले.
---------
राज्यपालांची आज कुंभयात्रा
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे सपत्निक शुक्रवारी नाशिकदौर्‍यावर येत असून, ते रामकुंडाबरोबच त्र्यंबकेश्वर येथील धार्मिकस्थळांना भेटी देणार आहेत. त्यानंतर ते इगतपुरी येथील मुंडेगाव येथून सेंट्रल किचनच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.