Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹८९० पार जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, नफ्यात आहे कंपनी

₹८९० पार जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, नफ्यात आहे कंपनी

या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ८२ टक्क्यांची वाढ होऊन तो ३,१८१.४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 09:26 AM2024-02-19T09:26:35+5:302024-02-19T09:27:05+5:30

या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ८२ टक्क्यांची वाढ होऊन तो ३,१८१.४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

PSU BPCL company Stock may cross 890 rs Now investors rush to buy the company is in profit bse nse senxex nifty | ₹८९० पार जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, नफ्यात आहे कंपनी

₹८९० पार जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, नफ्यात आहे कंपनी

PSU BPCL Stock: जर तुम्ही सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीच्या विचारात असाल असाल, तर तुमच्यासाठी ही उपयुक्त बातमी आहे. तुम्ही सरकारी इंधन  रिफायनर कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (BPCL Share) शेअर्सवर फोकस करू शकता. बीपीसीएलचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 4.6 टक्क्यांनी वाढून 682.50 रुपयांवर पोहोचले. दरम्यान, जेफरीजनं या शेअर्समध्ये मोठी तेजी येऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे.
 

कंपनीनं काय म्हटलं?
 

जेफरीजनं कंपनीच्या स्टॉकसाठी 890 रुपयांच्या टार्गेट प्राईजसह 'बाय' रेटिंग दिलं आहे. ही टार्गेट प्राईज बाजारातील सध्याच्या शेअर्सच्या किंमतीच्या तुलनेत जवळपास 36 टक्क्यांनी अधिक आहे.
 

डिसेंबर तिमाहीचे निकाल
 

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीपीसीएलचा एकत्रित निव्वळ नफा 82 टक्क्यांनी वाढून 3,181.42 कोटी रुपये झाला आहे. अपेक्षेपेक्षा चांगले रिफायनिंग मार्जिन आणि इंधन विक्रीवरील जास्त मार्जिन यामुळे कंपनीचा नफा वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 1,747.01 कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीचा नफा मागील तिमाही (जुलै-सप्टेंबर, 2023) 8,243.55 कोटी रुपयांपेक्षा कमी होता.
 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: PSU BPCL company Stock may cross 890 rs Now investors rush to buy the company is in profit bse nse senxex nifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.