मुंबई : सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलत मिळावी किंवा किमानपक्षी त्यात करभार वाढू नये, अशी अपेक्षा ‘लोकमत’च्या सर्वेक्षणाद्वारे वाचकांनी व्यक्त केली आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर होत असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून जनतेच्या अपेक्षांचे चित्र निर्माण झाले आहे. पेट्रोलच्या किमती याहून अधिक न वाढता स्थिर राहतील, असा विश्वास लोकांना वाटत आहे. मोदी सरकार आत्मनिर्भर भारताला अधिक बळ देतील, असा आशावादही व्यक्त होत आहे. ८२% - लोकांना वाटते की, आरोग्य क्षेत्राला अर्थसंकल्पात प्राधान्यक्रम दिला जाईल. ८१% - लोकांच्या मते महागाईत फारसा फरक पडणार नाही.४५% - वाचकांच्या मते अर्थसंकल्पात मध्यम आणि लघू उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल.
प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 7:59 AM