Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF योजनाही बनवू शकते करोडपती, संथ गती पण हमखास समृद्धी

PPF योजनाही बनवू शकते करोडपती, संथ गती पण हमखास समृद्धी

शेअर बाजाराव्यतिरिक्तही गुंतवणुकीचे अनेक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 06:21 PM2018-10-11T18:21:01+5:302018-10-11T18:23:48+5:30

शेअर बाजाराव्यतिरिक्तही गुंतवणुकीचे अनेक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत.

public provident fund scared of market volatility here is how to become crorepati | PPF योजनाही बनवू शकते करोडपती, संथ गती पण हमखास समृद्धी

PPF योजनाही बनवू शकते करोडपती, संथ गती पण हमखास समृद्धी

मुंबईः शेअर बाजारात सध्या कायमच पडझड सुरू असते. कधी शेअर्स वधारतात, तर कधी एकदम खाली येतात. तसेच तेलाचे वाढते दर, रुपयाची घसरण आणि अनेक उद्योगपतींनी लावलेला चुना या सर्व गोष्टींचा बाजारावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारात छोटी छोटी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारही धास्तावले आहेत. गुंतवणूकदारांना पैशांच्या सुरक्षेची काळजी सतावत असते. परंतु शेअर बाजाराव्यतिरिक्तही गुंतवणुकीचे अनेक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत.

तुम्ही सरकाराच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. त्या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला सुरक्षेचीही हमी देतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनाही गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. पीपीएफ ही योजना सर्वाधिक नफा मिळवून देणारी सरकारी योजना आहे. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवलेले पैसे करमुक्त असतात. या दीर्घकालीन बचत योजनेवर लाभार्थ्यांना 8 टक्के व्याजदरही दिले जाते. त्यामुळे ही योजना सर्वात लोकप्रिय ठरत आहे. या योजनेसोबत इतरही अनेक फायदे लाभार्थ्यांना मिळतात. कर्मचारी भविष्य निधीत दर वर्षाला तुमची गुंतवणूक 1.50 लाखांच्या घरात होत असते.

त्याचप्रमाणेच पीपीएफ योजनेतही एवढे पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पीपीएफवरील व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आले आहेत. सरकार पीपीएफ योजनेवरील व्याजदरात कायम बदल करत असते. पीपीएफमध्ये तुम्ही 15 वर्षांपर्यंत पैशांची गुंतवणूक करू शकता. तसेच त्यानंतरही तुम्ही या गुंतवलेल्या पैशांच्या मुदतीत पाच-पाच वर्षांची वाढही करता येते. त्यानंतर हा पैसा नॅशनल स्मॉल सेव्हिंग्ज फंडात जमा होतो आणि सरकार या पैशाचा वापर करते. तर हे पैसे बुडण्याची कोणतीही भीती नसते.

सरकारची सर्व छोट्या योजनांसह पीपीएफच्या व्याजदरात 50 बेसिस पॉइंट म्हणजे 0.50 टक्के वाढ करण्याची मनीषा आहे. त्यामुळे सरकार जानेवारी-मार्च या टप्प्यात व्याजदरात वाढ करू शकते. पीपीएफवर मिळणा-या कंपाऊंड इंटरेस्टची दरवर्षी गणना होते. जर तुम्ही 1.5 लाख रुपये वर्षाला जमा करत असाल, तर तुम्हाला 8 टक्के व्याजदरानं 15 वर्षांनंतर 43.93 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच 24 वर्षांनंतर तुम्हाला पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशावरच्या व्याजासह 1.08 कोटी रुपये मिळतील. म्हणजे तुम्ही 24 वर्षांत करोडपती होऊ शकता. तसेच 30 वर्षांनी तुम्हाला गुंतवलेल्या पैशावर व्याजदरासह 1.83 कोटींचा परतावा मिळणार आहे.

Web Title: public provident fund scared of market volatility here is how to become crorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :PPFपीपीएफ