‘ानभूल’ पुस्तकाचे प्रकाशनपणजी : साहित्याचा संस्कृतीशी अतूट संबंध असतो. या संबंधातूनच भावनिक नाते तयार होते. निसर्गाशी अशा प्रकारचे नाते तयार झाल्यावर साहित्याच्या अलंकारातून पर्यावरण आणि निसर्गाचे हितगूज वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम लेखकांकडून होते, असे समीक्षिका प्रा. स्नेहा महांबरे यांनी सांगितले. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा व राजलक्ष्मी साहित्य यांच्या संयुक्त विद्यमाने लेखिका सुमेधा कामत-देसाई यांच्या ‘रानभूल’ पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेटये यांच्या हस्ते झाले. या वेळी ब्रागांझा संस्थेचे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर, लेखिका सुमेधा कामत देसाई प्रकाशिका सुजाता भाटकर उपस्थित होते. डॉ. शेटये म्हणाले, विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे. विद्यार्थ्यांना निसर्ग, परिसर याबाबतचे ज्ञान असायला हवे. लेखिकेचा परिसराबाबतचा अभ्यास आणि त्यांची लेखन पद्धती अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळेच विद्यापीठाच्या प्रथम बी.ए च्या मराठीच्या अभ्यासक्रमात त्यांचे पुस्तक समाविष्ट होणे कौतुकाची बाब आहे. कामत यांची यापूर्वी मराठी व कोकणी मिळून 14 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘रानभूल’ पुस्तकात ललित, गद्य, निबंध यावर साहित्य आधारित आहे. विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबाबत प्रेम निर्माण झाल्यासच निसर्गाचे संगोपन शक्य आहे. ‘रानभूल’ पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला होता. सध्या परिसर संरक्षणाची आवश्यकता असून अशा पुस्तकांच्या वाचनाने विद्यार्थी परिसर संरक्षणाकडे वळतील, असे भाटकर यांनी सांगितले. (फोटो उपेंद्र देणार)
‘रानभूल’ पुस्तकाचे प्रकाशन
‘रानभूल’ पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Published: September 26, 2014 09:40 PM2014-09-26T21:40:54+5:302014-09-26T21:40:54+5:30