Join us  

केवळ ₹2 च्या या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, रोजच लागतंय अपर सर्किट, गुंतवणूकदार चकित!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 12:29 AM

बुधवारी अपर सर्किटनंतर शेअरचा भाव 52.18 रुपये एवढा होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे.

शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना केवळ एकाच वर्षात मल्टीबॅगर परतावा देत आश्चर्यचकित केले आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, पल्सर इंटरनॅशनलचा आहे. गेल्या वर्षी मे 2022 मध्ये, 2 रुपयांवर असलेला हा स्टॉक सध्या सातत्याने 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमुळे चर्चेत आहे. बुधवारी अपर सर्किटनंतर शेअरचा भाव 52.18 रुपये एवढा होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे.

केव्हा किती परतावा - या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या कालावधीत 4300 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. हा शेअर बीएसईवर तीन वर्षांच्या कालावधीत 4248.33 टक्क्यांनी वधारला. दोन वर्षांत 3378.67 टक्क्यांनी वधारला, तर एका वर्षात 2535.35 टक्क्यांनी वधारला आहे. याच बरोबर या शेअरने सहा महिन्यांत 2198.68 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 

याशिवाय, तीन महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांना 1080.54 टक्के एवढा परतावा मिळाला. तसेच एका महिन्याचा परताना जवळपास 165 टक्के एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रेडिंग आणि कंसल्टिंगशी संबंधित कंपनी पल्सर इंटरनॅशनल कंपनी 15 ऑक्टोबर 1990 रोजी स्थापन झाली. ही कंपनी सध्या, एक गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून काम करते

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक