Lokmat Money > बिझनेस न्यूज > डाळी आणखी कडाडल्या

डाळी आणखी कडाडल्या

येथील ठोक डाळ बाजारात डाळींचे भाव सोमवारी आणखी कडाडले. तूर डाळ तब्बल ४00 रुपयांनी, तर चणा डाळ २00 रुपयांनी महाग झाली आहे.

By admin | Published: November 17, 2015 03:24 AM2015-11-17T03:24:48+5:302015-11-17T03:24:48+5:30

येथील ठोक डाळ बाजारात डाळींचे भाव सोमवारी आणखी कडाडले. तूर डाळ तब्बल ४00 रुपयांनी, तर चणा डाळ २00 रुपयांनी महाग झाली आहे.

The pulses are even more sloppy | डाळी आणखी कडाडल्या

डाळी आणखी कडाडल्या

नवी दिल्ली : येथील ठोक डाळ बाजारात डाळींचे भाव सोमवारी आणखी कडाडले. तूर डाळ तब्बल ४00 रुपयांनी, तर चणा डाळ २00 रुपयांनी महाग झाली आहे.
४00 रुपयांच्या वाढीनंतर तूर डाळीचा भाव १0,६00 रुपये क्विंटल झाला. उत्तम दर्जाची तूर डाळ १२,000 ते १५,000 रुपये क्विंटल झाली. चणा डाळ ५,२00 ते ५,९५0 रुपये क्विंटल झाली.
उडीद डाळ मात्र ५00 रुपयांनी उतरली आहे. ९,५00 ते १0,८00 रुपये क्विंटल असा उडीद डाळीचा भाव राहिला. गेल्या काही महिन्यांपासून डाळींचे भाव सातत्याने वाढत आहेत. किरकोळ बाजारात तूर डाळ २00 रुपये किलो आहे. यावरून सरकारवर टीका होत आहे. मध्यंतरी सरकारने डाळींचा साठा करणाऱ्या साठेबाजांवर कारवाईही केली होती. तथापि, त्याचा फारसा परिणाम भावांवर झालेला नाही.
मागणी घटल्यामुळे दिल्लीतील तेल बाजारात शेंगदाणा तेलाचा भाव ५0 रुपयांनी उतरला आहे. त्याबरोबर हे तेल ९0५0 रुपये क्विंटल झाले. किरकोळ खरेदी-विक्रीमुळे अन्य तेलाचे भाव किरकोळ फेरफारासह आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिले.

Web Title: The pulses are even more sloppy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.