नागपूर : रोजच्या जेवणात लागणाऱ्या तूरडाळीचे भाव क्विंटलमागे हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो तूरडाळीसाठी ७० ते ७५ रुपये मोजावे लागत आहेत. कमी पावसामुळे सर्वच डाळी व कडधान्यांचे उत्पादन घटण्याचा अंदाज असल्याने त्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
तूरडाळीचे भाव १०० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धान्य व्यापाºयांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव किलोला १८० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे सरकारने तूरडाळ आयात सुरू करावी लागली होती. त्यामुळे तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यांतच भाव ५० रुपयांपर्यंत घसरले.
भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. त्याचा फटका तेव्हा धान्य व्यापाºयांना बसला आणि अनेक दाळ मिलही त्यामुळे बंद पडल्या. त्यामुळे व्यापाºयांनी तूरडाळीचा साठा केलाच नाही. पण यावर्षी पीक कमी येण्याच्या अंदाजामुळे व्यापाºयांनी सावधतेने पावले उचलली आहेत.
गेल्या वर्षी तुरीला भाव कमी मिळाल्यामुळे केंद्र सरकारने आधारभूत किंमत ५९०० रुपयांपर्यंत वाढविली आहे. एवढ्या किमतीत तूर खरेदी करणारा व्यापारी वाढीव भावातच डाळ विकणार आहे. शिवाय पीक कमी येण्याचा अंदाज खरा ठरल्यास भाव झपाट्याने वाढतील.
वाटचाल महागाईच्या दिशेनेच
तूरडाळीप्रमाणेच नोव्हेंबरमध्ये हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. हरभरा डाळीच्या किमतीत घाऊकमध्ये प्रति किलो १२ रुपयांची वाढ होऊन भाव ६० ते ६२ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच उडीद मोगर प्रति किलो ८ रुपये, मूग मोगर ८ रुपये, मसूर डाळ ३ रुपये, मूग डाळ ३ रुपये, देशी हरभरा ४ रुपये, ज्वारी ५ रुपये, काबुली चण्याचे भाव ५ रुपयांनी वाढले असून भाववाढीची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली.
सौदे बंद पाडले
कोल्हापूर : शुक्रवारी १७०० ते १९०० रुपये क्विंटल असणारा कांदा शनिवारी ७०० ते ११०० रुपयांपर्यंत आल्याने संतप्त शेतकºयांंनी शनिवारी बाजार समितीतील सौदेच बंद पाडले. बाजार समिती सभापती व सचिवांनी शेतकºयांची समजूत काढल्यानंतरसौदे पूर्ववत झाले.
आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगावमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव कमी झाले आहेत. सप्ताहात किमान भाव ३०१ तर कमाल १३५१ रु पये तर सर्वसाधारण भाव ७३१ रु पये इतके होते. लाल कांद्याला किमान ४००, कमाल २१०१ तर सरासरी १६२१ रु पये प्रती क्विंटल असा भाव मिळाला.
डाळी, कडधान्ये कडाडली; कांद्याचे मात्र पडले भाव
रोजच्या जेवणात लागणाऱ्या तूरडाळीचे भाव क्विंटलमागे हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो तूरडाळीसाठी ७० ते ७५ रुपये मोजावे लागत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 02:08 AM2018-11-18T02:08:58+5:302018-11-18T02:10:14+5:30