Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यात डाळींचे उत्पादन घटले

राज्यात डाळींचे उत्पादन घटले

दुष्काळामुळे महाराष्ट्रात डाळींचे उत्पादन गेल्या दोन वर्षांत निम्म्याहून अधिक घटले. देशभरात डाळींच्या उत्पादनात घट झाली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक घट झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 01:37 AM2017-02-09T01:37:11+5:302017-02-09T01:37:11+5:30

दुष्काळामुळे महाराष्ट्रात डाळींचे उत्पादन गेल्या दोन वर्षांत निम्म्याहून अधिक घटले. देशभरात डाळींच्या उत्पादनात घट झाली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक घट झाली

Pulses production declined in the state | राज्यात डाळींचे उत्पादन घटले

राज्यात डाळींचे उत्पादन घटले

नितीन अग्रवाल , नवी दिल्ली
दुष्काळामुळे महाराष्ट्रात डाळींचे उत्पादन गेल्या दोन वर्षांत निम्म्याहून अधिक घटले. देशभरात डाळींच्या उत्पादनात घट झाली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक घट झाली असून, ती उर्वरित सर्व राज्यांच्या एकूण घटलेल्या उत्पादनाहूनही अधिक आहे.
गेल्या तीन वर्षांपासून डाळीच्या उत्पादनात घट होत आहे, असे कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले. भाजपाच्या पूनम महाजन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी लोकसभेत जी आकडेवारी सादर केली त्यावरून महाराष्ट्रात केवळ दोन वर्षांत डाळींच्या उत्पादनात १,७५९ टन घट झाली, तर उर्वरित सर्व राज्यांत या काळात १,०२८ टन एवढीच घट झाली. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात डाळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते.

Web Title: Pulses production declined in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.