Lokmat Money > बिझनेस न्यूज > पंपमालक बंद करणार पेट्रोल, डिझेलची खरेदी

पंपमालक बंद करणार पेट्रोल, डिझेलची खरेदी

देशभर पेट्रोलचे दर रोजच्या रोज बदलण्याचा सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही, असे पेट्रोलपंपमालकांनी म्हटले

By admin | Published: June 12, 2017 12:18 AM2017-06-12T00:18:06+5:302017-06-12T00:18:06+5:30

देशभर पेट्रोलचे दर रोजच्या रोज बदलण्याचा सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही, असे पेट्रोलपंपमालकांनी म्हटले

Pump manufactures will stop petrol and diesel | पंपमालक बंद करणार पेट्रोल, डिझेलची खरेदी

पंपमालक बंद करणार पेट्रोल, डिझेलची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभर पेट्रोलचे दर रोजच्या रोज बदलण्याचा सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही, असे पेट्रोलपंपमालकांनी म्हटले. सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून १६ जूनपासून पेट्रेल व डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय हा काही संप नाही, असे मालकांच्या संघटनांनी म्हटले आहे. १६ जूनपासून खरेदी नाही याचा अर्थ ज्या दिवशी आमच्याकडील साठा संपेल त्या दिवशी पंपांकडे पेट्रोल व डिझेल नसेल, असे अखिल भारतीय पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी सांगितले.
सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पाहून आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल इंधनाच्या किमतीचा आढावा दर दोन आठवड्यांंनी घेतात. पाँडेचरी, चंदिगढ, जमशेदपूर, उदयपूर आणि विशाखापट्टणम येथे पेट्रोलच्या किमती रोजच्या रोज बदलण्याचा १ मेपासून करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तो देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वरील पाच शहरांत एस्सार आॅईल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजनेदेखील रोजच्या रोज किमती बदलल्या.
रोजच्या रोज किमती बदलण्याच्या निर्णयामुळे इंधनाच्या व्यवहारात पारदर्शकता येईल, असे इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने निवेदनात म्हटले.

Web Title: Pump manufactures will stop petrol and diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.