Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुणे-औरंगाबाद परिपूर्ण गृहप्रदर्शन (मुख्य बातमी)

पुणे-औरंगाबाद परिपूर्ण गृहप्रदर्शन (मुख्य बातमी)

परवडणारे घर : पहिल्याच दिवशी अनेकांनी केली बुकिंग

By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:06+5:302015-02-14T23:52:06+5:30

परवडणारे घर : पहिल्याच दिवशी अनेकांनी केली बुकिंग

Pune-Aurangabad Perfect Home Show (Chief News) | पुणे-औरंगाबाद परिपूर्ण गृहप्रदर्शन (मुख्य बातमी)

पुणे-औरंगाबाद परिपूर्ण गृहप्रदर्शन (मुख्य बातमी)

वडणारे घर : पहिल्याच दिवशी अनेकांनी केली बुकिंग
औरंगाबाद : कोणाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी पुण्यात घर घ्यायचे आहे. तर कोणाला औरंगाबादेत स्थायिक व्हायचे आहे. तर काही जण घरांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा सर्व ग्राहकांनी लोकमत आयोजित गृहप्रदर्शनाला भेट दिली. एकाच छताखाली दोन्ही महानगरातील नामांकित बिल्डर्सचे उत्कृष्ट, दर्जेदार गृहप्रकल्प पाहून सारे जाम खुश झाले. अनेकांनी तर लगेच बुकिंगही केली. तर काहींनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वत:च्या मालकीच्या नवीन घरात राहण्यास जाण्यासाठी तयारी सुरू केली.
पर्यटनाची राजधानी औरंगाबाद व विद्येचे माहेरघर पुणे या दोन्ही महानगरात हक्काचे घर घेण्यासाठी मराठवाड्यातील हजारो गृहइच्छुक तयार आहेत. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात महानगरात व आसपासच्या परिसरात फिरून गृहप्रकल्प पाहण्यास एवढा वेळ देणे प्रत्येकाला जमत नाही, तसेच प्रवासातच खर्च अफाट होतो, या ग्राहकांच्या अडचणी ओळखून लोकमतने पुणे-औरंगाबादेतील नामांकित बिल्डर्सला एकत्र आणून दर्जेदार गृहप्रकल्पांचे गृहप्रदर्शन भरविले आहे. प्रोझोन मॉल येथे एकाच छताखाली या दोन्ही महानगरातील गृहप्रकल्पांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ५० बिल्डर्सचे १०० हून अधिक गृहप्रकल्प या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये ठरत आहे. एका फ्लॅटसाठी बहुपर्याय उपलब्ध झाल्याने ग्राहकांना चोखंदळपणे घराची खरेदी करता येते. म्हणूनच पहिल्या दिवशी औरंगाबाद जिल्हाच नव्हे तर जालना, बीड, नांदेड येथील गृहइच्छुकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन औरंगाबाद व पुण्याच्या आसपासच्या परिसरातील गृहप्रकल्पांची माहिती घेतली. काही बिल्डर्सनी खास टीव्हीची व्यवस्था केली आहे. आपल्या गृहप्रकल्पांची व्हिडिओ त्यात दाखविण्यात येत आहे. थ्री डायमेशनमुळे आपण प्रत्यक्ष फ्लॅट पाहत असल्याचा भास होत आहे. पहिल्या दिवशी गृहप्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. काहींनी बुकिंग केले तर काहींनी प्रत्यक्षात साईटवर जाऊन गृहप्रकल्प बघण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रदर्शनात बिल्डर्ससोबतच इंटेरिअर डिझाईनसाठी आर्किटेक्ट, फर्निचर, वास्तूशास्त्राचे स्टॉल आहेत. एक परिपूर्ण गृहप्रदर्शन सर्वांना पाहण्यास मिळत आहे. प्रदर्शन पाहून झाल्यावर प्रत्येकाच्या चेहर्‍यावर समाधान झळकत आहे. कारण, प्रत्येकाच्या बजेटमधील घर हेच या प्रदर्शनाच्या यशाचे गमक ठरत आहे.
(जोड आहे)

Web Title: Pune-Aurangabad Perfect Home Show (Chief News)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.