Lokmat Money > बिझनेस न्यूज > ..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा

..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा

Cyber Crime : दिवसेंदिवस देशात सायबर गुन्हेगारांचा विळखा वाढत चालला आहे. पुण्यात एका दिवसात तब्बल 3 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

By राहुल पुंडे | Published: October 18, 2024 04:55 PM2024-10-18T16:55:38+5:302024-10-18T16:57:05+5:30

Cyber Crime : दिवसेंदिवस देशात सायबर गुन्हेगारांचा विळखा वाढत चालला आहे. पुण्यात एका दिवसात तब्बल 3 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

pune cyber crime 3 crore 35 lakh cyber fraud of pune residents in one day | ..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा

..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा

Cyber Crime : देशात मोबाईल नेटवर्क क्षेत्रात जिओची एन्ट्री झाल्यापासून इंटरनेटचा स्पीड झपाट्याने वाढला. तर दुसरीकडे सरकारच्या डिजिटल धोरणामुळे आता सर्व आर्थिक व्यवहार हातातल्या मोबाईलवर आले आहेत. १ रुपयांपासून कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे होत आहे. मात्र, याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी देशभर आपलं नेटवर्क प्रस्थापित केलं आहे. रोज कुणाला ना कुणाला जाळ्यात अडकवून त्याची आर्थिक फसवणूक केली जात आहे. या गुन्हेगारांनी फ्रॉड करण्याचे इतके प्रकार शोधून काढलेत की अगदी उच्च शिक्षित लोकंही यात लगेच फसतात. एकट्या पुणे शहरात एका दिवसांत ३ कोटी ३५ लाख रुपयांना गंडा घातला आहे.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून भरघोस नफा मिळवून देतो, तुमच्या आधार किंवा पॅनकार्डावरून मनी लाँडरींग करण्यात आलंय, सोशल मीडिया पोस्ट लाईक किंवा शेअर करण्याचा टास्क, पार्टटाईम जॉब देण्याचं आमिष, न्यूड व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेलिंग, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे व्हायरल असलेली लिंक पाठवणे ही यादी संपणार नाही इतकी मोठी आहे. सायबर चोरट्यांकडून वापरण्यात येणार्‍या नवनवीन फंड्यांमुळे सायबर क्राईम सेलच्याही नाकी नऊ आले आहेत. शहरात एकाच दिवसात झालेल्या ९ घटनांमध्ये तब्बल ३ कोटी ३५ लाख ३ हजार १७७ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

वडगाव शेरी येथील 28 वर्षीय तरुण लवकेश विलासराव एकापुरे यास अनोळखी व्यक्तींनी मोबाईलवर संपर्क केला. स्टॉक मार्केट ट्रेडिंग आयपीओ अलॉटमध्ये भरघोस नफा मिळवून देतो असे प्रलोभन दाखवून आरोपींनी त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यास लिंक पाठवून अ‍ॅपला रजिस्ट्रेशन करण्यास सांगून व्हॉट्सअप ग्रुपला त्याला अ‍ॅड करण्यात आले. सदर ग्रुपचे अ‍ॅडमीन वेळोवेळी त्याच्या संपर्कात राहून गुंतवणुकीकरिता दिलेल्या अ‍ॅपवर नफा होत असल्याचे भासवून एकूण आठ लाख 40 हजार रुपये घेऊन त्याचा कोणता परतावा न देता फसवणूक करण्यात आली आहे.

शेअर मार्केटमधील नफ्याचं आमिष

खराडी चंदननगर येथे राहणार्‍या सती कुमार अनार यांना फेसबुक स्क्रोल करताना, एक शेअर मार्केटची एका आकर्षक जाहिरात दिसली. त्यावर त्यांनी क्लिक करताच रिना म्हणोत्रा ५५ स्टॉक्स या ग्रुपमध्ये त्यांना अ‍ॅड करून घेण्यात आले. त्यानंतर व्हॉट्सअप नंबरवर एक लिंक देऊन ती उघडल्यावर तक्रारदार यांचे पॅनकार्ड आणि बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आली. सती कुमार यांना विविध शेअर्समध्ये पैसे गुंतवूण मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. यामाध्यमातून सती कुमार यांच्याकडून वेगवेगळ्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करुन तब्बल १७ लाख रुपये उकळण्यात आले. याच पद्धतीने कौसरबाग येथे राहाणार्‍या सैफ आदम शेख यांनाही शेअर मार्केटमधून मोठा नफा कमावून देतो असं सांगून ई ट्रेंडस या अ‍ॅपला जोडून घेतलं. याद्वारे अज्ञात आरोपींनी त्यांची ३४ लाख ६९ हजारांची फसवणूक करण्यात आली.

क्रेडिट कार्ड फ्रॉड

वाघोलीतील अमोल प्रदीप ठोंबरे (वय ३२) यांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना अनोळखी क्रमांकावरून इंडसइंड बँकेतील क्रेडिट कार्ड विभागातील कर्मचारी बोलत असल्याचे सांगत आरोपींनी त्यांच्याशी संपर्क केला. बँकेने क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी नवे अ‍ॅप्लिकेशन सुरू केल्याचे सांगितले. पीडित व्यक्तीची माहिती सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एक लिंक पाठवत त्याद्वारे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे मोबाईलचा संपूर्ण ताबा मिळवून फिर्यादींच्या खात्यातून परस्पर ३ लाख १५ हजार रुपये काढून घेतले.

परताव्याच्या आमिषाने 21लाखांचा गंडा
पिंपरीतील एका महिलेला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने २५ लाखांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. पीडित व्यक्तिचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी काही रक्कम या महिलेच्या अकाउंटवर पाठवली. चांगला परतावा मिळतोय असं  समजून महिलेने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. थोडे थोडे करुन तब्बल २१ लाख रुपये महिलेने विविध बँक खात्यात ट्रान्सफर केले. मात्र, परतावा काही मिळाला नाही. त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोननंबर बंद करण्यात आला होता.

कसं राहायचं सुरक्षित?

  • सायबर गुन्हेगारांचं नेटवर्क संपूर्ण देशात पसरल्याचे पाहायला मिळत आहे. हे आरोपी राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील असल्याचेही विविध गुन्ह्यातून समोर आले. तर काही प्रकरणात याचे आंतरराष्ट्रीय नेटवर्कही समोर आलं आहे.
  • या प्रकरणांची व्याप्ती पाहता गेलेले पैसे पुन्हा मिळवणे अशक्य होते. अशात प्रतिबंधात्मक उपाय हाच गुन्हे रोखण्याचा पर्याय आहे.
  • कुठल्याही अनोळखी क्रमांक किंवा मॅसेजला उत्तर देऊ नका. अथवा लिंकवर क्लिक करू नका
  • जास्त पैसे किंवा नफा मिळवून देत असल्याचे सांगून पैसे गुंतवण्यास सांगत असेल तर अशा गोष्टींपासून दूर राहा.
  • गुगल पे, फोन पे अशा ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपला ज्या खात्यात कमी पैसे असतात असेच खाते जोडा.
  • अनोळखी नंबरवरुन आलेले व्हिडीओ कॉल स्वीकारू नका.
  • बँक किंवा कुठलीही वित्तीय संस्था तुम्हाला फोनवरुन कधीच तुमच्या खात्याची माहिती विचारत नाही. त्यामुळे ओटीपी सारखी संवेदनशील माहिती कुणालाही शेअर करू नका.
  • मोबाईलमध्ये कुठलेही थर्डपार्टी अ‍ॅप इन्स्टॉल करू नये.
  • टेलिग्रामसारख्या माध्यमातून सर्वात जास्त फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. असे अ‍ॅप काळजीपूर्वक वापरा.

Web Title: pune cyber crime 3 crore 35 lakh cyber fraud of pune residents in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.