Join us

25 रुपयांपेक्षाही स्वस्त असलेल्या या सरकारी बँकेच्या शेअरनं दिला बम्पर परतावा; 6 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 3:57 PM

सरकारी बँकांचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त परताना देत आहेत...

सरकारी बँकांचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त परताना देत आहेत. आज शुक्रवारी पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या शेअर्सनी सकाळच्या सुमारास 10 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली होती. हा शेअर दुपारच्या सुमारास 7 टक्क्यांहून अधिकच्या स्थरावर ट्रेड होत होता. तो 23.65 रुपयांवर व्यवहार करत होता.

शेअर प्राइस हिस्ट्री -पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या शेअरची हिस्ट्री पाहता, या शेअरने यावर्षात आतापर्यंत 43 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता या शेअरने 53 टक्क्यांहून अधिकचा परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने गेल्या एका महिन्यातच तब्बल ४३ टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 24.95 रुपये एवढा आहे तर निचांक 13 रुपये एवढा आहे.

...म्हणून पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या शेअरने घेतलाय रॉकेट स्पीडखरे तर, दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच, जुलै ते सप्टेंबर या काळात सरकारी बँकांचा परफॉर्मेंस चांगला राहिला आहे. यामुळे शेअर बाजारात या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. 

पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत अडकलेल्या कर्जांसाठी आर्थिक तरतुदीची गरज घटल्याने बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 218 कोटी रुपये एवढा होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक