Join us

Milk Price Hike : अमूल आणि मदर डेअरीनंतर आता 'या' ब्रँडचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 8:40 AM

Milk Price Hike : मिल्कफेड वेरका (Verka) या ब्रँड नावाने दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते. अमूल आणि मदर डेअरीच्या दरात वाढ केल्यानंतर मिल्कफेडने हे पाऊल उचलले आहे.

नवी दिल्ली :  दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर इतर कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थही महाग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेडने (Milkfed Punjab) दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मिल्कफेड वेरका (Verka) या ब्रँड नावाने दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते. अमूल आणि मदर डेअरीच्या दरात वाढ केल्यानंतर मिल्कफेडने हे पाऊल उचलले आहे.

19 ऑगस्टपासून दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढतील, असे मिल्कफेडने जारी केलेल्या निवेदनात एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. यापूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. 17 ऑगस्टपासून दूध नवीन दराने मिळत आहे. अमूल गोल्डचा भाव आता 61 रुपये प्रति लिटर झाला आहे, जो पूर्वी 59 रुपये प्रति लिटर होता.

दरम्यान, कंपन्यांकडून गेल्या सहा महिन्यांत दुधाचे दर वाढविण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मार्चमध्ये कंपन्यांनी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली होती. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ विकतात, म्हणाले की अहमदाबाद आणि सौराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबईमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. आणि गुजरातच्या इतर बाजारपेठांनी करण्याचा निर्णय घेतला आहे.

2 रुपये प्रति लिटर दरवाढीमुळे एमआपी (कमाल किरकोळ किंमत) मध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी सरासरी अन्न महागाईपेक्षा कमी आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची विक्री करते.  गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने म्हटले आहे की, एकूण संचालन आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे किंमती वाढल्या आहेत. केवळ मागील वर्षाच्या तुलनेत पशुखाद्याचा खर्च सुमारे 20 टक्क्यांनी वाढला आहे.

टॅग्स :दूधव्यवसाय