नवी दिल्ली : . पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट करत असते. देशात आधीच कोरोनाचा संकट आहे. यातच बँकेने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. देशात डिजीटल पेमेंटमुळे ऑनलाइन फ्रॉडचा धोकाही वाढत आहे. बँकेने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. याआधीही केंद्र सरकारने सुद्धा नोटीफिकेशन जारी करत सामान्य जनता आणि संस्थांना मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली होती. (punjab national bank alert to customers regrding fraud saftey tips given by pnb)
आपल्या डिजीटल व्यवहारांची माहिती मिळवून फसवणूक करण्यासाठी अनेक फ्रॉड लोक तयार आहेत. त्यामुळे नेहमी सतर्क राहा, फसवणूक करणारे फोन कॉल आणि एसएमएस यांच्या भूलथापांवर विश्वास ठेऊ नका, असे PNB बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
PNB बँकेने केलेल्या ट्विटमध्ये एक फोटोही दिला आहे.
धोखाधड़ी करने वालों के पास आपको गुमराह करने के कई तरीके मौजूद हैं।
— Punjab National Bank (@pnbindia) April 26, 2021
इसलिए हमेशा सतर्क रहें और फर्जी फोन कॉल एवं SMS के झांसे में न आएं। pic.twitter.com/4BqPuNqH4F
दरम्यान, आपला पिन नंबर, सीव्हीव्ही नंबर, ओटीपी आणि एटीएम नंबर कोणा बरोबरही शेअर करु नका, असे केल्यास आपली फसवणूक होऊ शकते. पैसे ट्रान्सफर करताना नेमके कोणाला पैसे ट्रान्फर करत आहात त्याचे व्हेरिफीकेशन करा. वेगवेगळ्या मार्गांनी फ्रॉड लोक ग्राहकांना चुना लावत आहेत.
'या' गोष्टी लक्षात ठेवा...
तुमचे कार्ड कोणालाही देऊ नका, कार्ड स्वाईप करना सावधान रहा. तुमचा पिन नंबर कोणालाही देऊ नक. बिल भरल्यानंतर डेबिट कार्ड चेक करा. शॉपिंग केल्यावर बिल घ्यायला विसरु नका. बिल आणि अकाऊटमधून डिडक्ट झालेले पैसे चेक करा. कार्ड स्वाईप केल्यावर त्याची कॉपी घ्यायला विसरु नका.
अशाप्रकारे बँक फ्रॉड टाळा...
1) OTP, PIN, CVV, UPI PIN शेअर करु नका.
2) फोनमध्ये बँक खात्यासंदर्भात कोणतीही माहिती फोनमध्ये सेव्ह करु नका.
3) ATM कार्ड किंवा डेबिट कार्ड यांती माहिती कुणाबरोबरही शेअर करु नका.
4) बॅक आपल्या कार्डसंदर्भात कोणतीही माहिती मागत नाही.
5) पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करु नका.
6) अनोळखी लिंकवर क्लीक करु नका.
7) स्पायवेअरचा धोका ओळखा.