Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB च्या करोडो ग्राहकांना मोठा झटका, बँकेने कमी केले व्याजदर; जाणून घ्या बचत खात्यावर किती व्याज मिळेल?

PNB च्या करोडो ग्राहकांना मोठा झटका, बँकेने कमी केले व्याजदर; जाणून घ्या बचत खात्यावर किती व्याज मिळेल?

PNB Interest Rates : बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा देशातील करोडो ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 05:06 PM2022-04-05T17:06:19+5:302022-04-05T17:06:53+5:30

PNB Interest Rates : बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा देशातील करोडो ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

punjab national bank cuts interest rates on savings accounts check here latest rates  | PNB च्या करोडो ग्राहकांना मोठा झटका, बँकेने कमी केले व्याजदर; जाणून घ्या बचत खात्यावर किती व्याज मिळेल?

PNB च्या करोडो ग्राहकांना मोठा झटका, बँकेने कमी केले व्याजदर; जाणून घ्या बचत खात्यावर किती व्याज मिळेल?

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. पंजाब नॅशनल बँकेने बचत खात्यावरील (savings account) व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा देशातील करोडो ग्राहकांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, आता बँक तुम्हाला कोणत्या दराने व्याजाचा लाभ देईल, याबाबत पाहूया...

पंजाब नॅशनल बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 10 लाख रुपयांपेक्षा कमी खातेधारकांना आता 2.70 टक्के दराने व्याज मिळणार आहे. याचबरोबर 10 लाख ते 500 कोटी रुपयांपर्यंतच्या खातेधारकांना 2.75 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. बँकेने जारी केलेले नवीन दर 4 एप्रिलपासून लागू झाले आहेत. या बदलाचा परिणाम देशांतर्गत ग्राहकांसोबतच एनआरआय ग्राहकांवरही होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँकेने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही व्याजदर कपातीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बँकेने 10 लाखांपेक्षा कमी असलेल्या खात्यांवरील व्याजाची रक्कम 2.75 टक्के कमी केली होती. त्याचवेळी 10 लाख ते 500 कोटी रुपयांच्या बचत खात्यावरील व्याजदर 2.80 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय, पंजाब नॅशनल बँकेने सांगितले की, 4 एप्रिल 2022 पासून म्हणजेच आजपासून बँकेत सकारात्मक वेतन प्रणाली अनिवार्य झाली आहे. जर कोणत्याही ग्राहकाने बँकेच्या शाखेतून किंवा डिजिटल चॅनलद्वारे 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे धनादेश जारी केले, तर त्यांच्यासाठी PPS कंफर्मेशन आवश्यक असणार आहे.

टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता
पंजाब नॅशनल बँकेच्या या सुविधेबद्दल तपशीलवार माहिती घेण्यासाठी तुम्ही  1800-180-2222  किंवा 1800-103-2222 या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता.
 

Web Title: punjab national bank cuts interest rates on savings accounts check here latest rates 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.