Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB चा मुलांसाठी मोठा निर्णय, सुरक्षित भविष्यासाठी आणली 'ही' खास सुविधा 

PNB चा मुलांसाठी मोठा निर्णय, सुरक्षित भविष्यासाठी आणली 'ही' खास सुविधा 

Punjab National Bank : मुलांमध्ये लहानपणापासून सेव्हिंग करण्याची सवय व्हावी म्हणून बँकेने हे खास सेव्हिंग फंड अकाउंट आणले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 01:55 PM2021-07-11T13:55:20+5:302021-07-11T13:56:10+5:30

Punjab National Bank : मुलांमध्ये लहानपणापासून सेव्हिंग करण्याची सवय व्हावी म्हणून बँकेने हे खास सेव्हिंग फंड अकाउंट आणले आहे.

punjab national bank give facility to junior saving fund account know about it  | PNB चा मुलांसाठी मोठा निर्णय, सुरक्षित भविष्यासाठी आणली 'ही' खास सुविधा 

PNB चा मुलांसाठी मोठा निर्णय, सुरक्षित भविष्यासाठी आणली 'ही' खास सुविधा 

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) मुलांसाठी एक खास सुविधा आणली आली आहे. या सुविधेमध्ये बँक मुलांसाठी खास अकाउंट आणले आहे, ज्याद्वारे तुम्ही आपल्या मुलांचे भविष्य घडवू शकता. या अकाउंटचे नाव पीएनबी ज्युनिअर एसएफ अकाउंट (PNB Junior SF Account) आहे. मुलांमध्ये लहानपणापासून सेव्हिंग करण्याची सवय व्हावी म्हणून बँकेने हे खास सेव्हिंग फंड अकाउंट आणले आहे.

जर अल्पवयीन मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तो स्वत: च्या नावे देखील हे अकाउंट उघडू शकतो. हे अकाउंट उघडण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. यामध्ये फोटोबरोबरच ओळखपत्र आणि रहिवासी दाखलाही आवश्यक आहे. या अकाउंटवर बँक आपल्या मुलांना बर्‍याच खास सुविधा देत आहे. 

PNB Junior SF Account ची खासियत...
>> हे अकाउंट अल्पवयीन मुलांसाठी उघडले जाईल.
>> हे अकाउंट मुलांच्या कायदेशीर आणि नैसर्गिक पालकांद्वारे उघडता येऊ शकते.
>> या व्यतिरिक्त, 10 वर्षांवरील मुले स्वतःच हे अकाउंट उघडू आणि ऑपरेट करू शकतात.
>> तुम्हाला या अकाउंटसाठी किमान शिल्लक लागत नाही.
>> या अकाउंटमध्ये प्रारंभिक ठेव शून्य आहे.

PNB कडून ट्विट
पीएनबीने ट्विटद्वारे या अकाउंटबद्दल माहिती दिली आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, पीएनबी ज्युनिअर एसएफ अकाउंटने मुलांना लवकर बचत करण्याची सवय लावा! पीएनबी ज्युनिअर एसएफ अकाउंटद्वारे तुम्ही आपल्या मुलांना सुरक्षित भविष्य देऊ शकता.

मोफत करा NEFT
या अकाउंटमध्ये किमान त्रैमासिक सरासरी शिल्लक (Minimum Quarterly Average Balance) शून्य आहे. याशिवाय, या अकाउंटमध्ये मुलांना 50 पानांचे चेकबुक बँक देते. हे एका वर्षासाठी असते. तसेच, जर तुम्ही या खात्याद्वारे NEFT व्यवहार केले तर तुम्ही दररोज 10 हजार रुपयांपर्यंतचे विनामूल्य व्यवहार करू शकता.

Rupay ATM Card मिळेल
शाळा व महाविद्यालयांसाठी डिमांड ड्राफ्ट विनामूल्य आहे. दरम्यान Rupay ATM Card वर ग्राहकांना दररोज पाच हजार रुपये काढण्याची सुविधा मिळते.


अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा
या अकाउंटबद्दल अधिक माहितीसाठी तुम्हीhttps://www.pnbindia.in/pnb-junior-sf-account.html  या लिंकला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला अकाउंटशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.

Web Title: punjab national bank give facility to junior saving fund account know about it 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.