नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर दिली आहे. तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, बँकेने तुमच्यासाठी खास सुविधा आणली आहे. आता बँक आपल्या ग्राहकांना 8 लाख रुपयांची सुविधा सहज देत आहे. जर तुम्हालाही पैशांची गरज असेल तर तुम्ही या विशेष सुविधेअंतर्गत बँकेतून पैसे उभे करू शकता.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना इंस्टा लोनद्वारे 8 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. तुम्हालाही या सुविधेअंतर्गत वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला फक्त तुमचा मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला हे कर्ज (Loan) सहज मिळेल. बँकेने ट्विट करून आपली प्रक्रिया स्पष्ट केली आहे.
ट्विटद्वारे बँकेने दिली माहितीपंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले की, 'आता बँकेकडून कर्ज घेणे जेवण ऑर्डर करण्याइतके सोपे आहे. तुम्ही कमी व्याजदरासह वैयक्तिक कर्ज शोधत असाल, तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडून इन्स्टा लोनसाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी, तुम्ही tinyurl.com/t3u6dcnd या लिंकवर क्लिक करून वेबसाइटला भेट देऊ शकता.'
कोण घेऊ शकतं लाभ?- बँकेच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी, ग्राहक हा केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा पीएसयूचा कर्मचारी असावा.- हे कर्ज काही मिनिटांत वितरित केले जाते.- या कर्जाची सुविधा 24*7 उपलब्ध आहे.- या अंतर्गत ग्राहकांना 8 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.- यामध्ये प्रोसेसिंग फी शून्य आहे.