नवी दिल्ली : पीएनबीमध्ये (PNB ) खाते असलेल्या ग्राहकांना बँकेकडून विशेष सुविधा दिली जात आहे. तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल तर आता तुम्हाला काही मिनिटांत कर्जाची सुविधा मिळणार आहे. याबाबत पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करून माहिती दिली आहे. आता तुम्हाला फक्त 4 क्लिकमध्ये कर्ज मिळेल म्हणजेच तुम्हाला लांबलचक कागदपत्रे भरण्याची गरज नाही, असे बँकेने म्हटले आहे.
बँकेकडून मिळणारे हे कर्ज पेपरलेस असणार आहे. दरम्यान, प्री-अप्रुव्ह्ड पर्सनल कर्जासाठी तुम्हाला फक्त एक ओटीपी (OTP) टाकावा लागेल आणि तुमचे काही महत्त्वाचे डिटेल्स देखील द्यावे लागतील, त्यानंतर कर्जासाठी तुमचा अर्ज भरला जाईल.
PNB कडून ट्विटपीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटवर म्हटले आहे की, तुम्ही आता पेपरलेस-प्री-अप्रुव्ह्ड कर्जासाठी सहज अर्ज करू शकता. तुम्हाला फक्त एक OTP टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनिटांत कर्ज मिळेल. जाणून घ्या काय आहे, बँकेची ही खास सुविधा?
कर्जासाठी कसा करू शकता अर्ज?- सर्वात आधी तुम्हाला पीएनबी वन अॅपच्या होम पेजवर जावे लागेल.- येथे तुम्हाला ऑफर्सचा ऑप्शन निवडावा लागेल.- यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व डिटेल्स कंफर्म करावी लागेल.- आता तुम्हाला Next वर क्लिक करावे लागेल.- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर रक्कम टाकावी लागेल, म्हणजेच तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम टाकावी लागेल.- आता तुम्हाला सर्व नियम आणि अटी वाचायच्या आहेत, त्यानंतर Accept and Procced वर क्लिक करावे लागेल.- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.- OTP एंटर करा आणि सबमिट OTP वर क्लिक करा.- आता तुमचा कर्ज अर्ज पूर्ण झाला आहे.