Join us

PNB ग्राहकांना धक्का! 1 डिसेंबरपासून बँक करणार मोठा बदल, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 10:11 AM

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबरपासून बँकेत बचत खाते असणाऱ्या खातेधारकांच्या व्याजदरात कपात केली जाईल.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या खातेधारकांना मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. बँकेने बचत खात्याच्या व्याजदरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेने 1 डिसेंबरपासून बचत खात्याचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबरपासून बँकेत बचत खाते असणाऱ्या खातेधारकांच्या व्याजदरात कपात केली जाईल.

पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 2.80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बँकेच्या या निर्णयामुळे नवीन आणि जुने दोन्ही ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेनुसार, 1 डिसेंबर 2021 पासून, बचत खात्यातील 10 लाख रुपयांपेक्षा कमी बचत निधी खात्यावरील शिल्लकसाठी व्याज दर वार्षिक 2.80 टक्के असेल. तसेच, 10 लाख रुपये आणि त्याहून अधिकसाठी व्याज दर वार्षिक 2.85 टक्के असणार आहे.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक आहे, त्याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) पहिल्या क्रमांकावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यावर वार्षिक 2.70 टक्के व्याज मिळते. तर कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि इंडसइंड बँक (IndusInd Bank) बचत खात्यांवरील व्याज दर वार्षिक 4-6 टक्के आहे.

सरकारी बँकांमध्ये किती व्याज दर?आयडीबीआय बँक  3 ते 3.25 टक्केकॅनरा बँक - 2.90 ते 3.20 टक्केबँक ऑफ बडोदा - 2.75 ते 3.20 टक्केपंजाब अँड सिंध बँक - 3.10 टक्के व्याज मिळत आहे.

खासगी बँका देतायेत 3 ते 5 टक्के व्याजएचजीएफसी बँक - 3 ते 3.5 टक्केआयसीआयसीआय बँक - 3 ते 3.5 टक्केकोटक महिंद्रा बँक - 3.5 टक्केइंडसइंड बँक – 4 ते 5 टक्के

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकबँक