Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला नेमाडे, कोत्तापलेंचा विरोध

पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला नेमाडे, कोत्तापलेंचा विरोध

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुरस्कार रद्द करण्याविषयी पत्र

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:19+5:302015-08-16T23:44:19+5:30

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुरस्कार रद्द करण्याविषयी पत्र

Purandare's 'Maharashtra Bhushan' has been opposed to Nameda, Kottapalene | पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला नेमाडे, कोत्तापलेंचा विरोध

पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला नेमाडे, कोत्तापलेंचा विरोध

ाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुरस्कार रद्द करण्याविषयी पत्र
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्यास ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे आणि भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापले यांनी विरोध केला आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे.
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ समितीमध्ये एकही तज्ज्ञ इतिहास संशोधक नसल्याचे नमूद करत, पुरंदरे यांच्या इतिहासलेखनाची आणि ऐतिहासिक भूमिकांची तपासणी केली नसल्याचा आरोप या सिहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, भारतीय महिला फेडरेशनच्या मेघा पानसरे, शिवप्रेमी जनजागरण समितीचे अध्यक्ष मुकुंद काकडे आणि महात्मा ज्योतीराव फुले समता प्रतिष्ठानचे दादासाहेब नाईकनवरे यांनी देखील या पत्रावर स्वाक्षरी करून पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.
नियोजित पुरस्कारार्थी पुरदंरे हे अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व या पुरस्कारासाठी निवडणे म्हणजे पुरस्काराचे अवमूल्यन ठरेल, असे सांगून या मान्यवरांनी म्हटले आहे की, जातीय तेढ निर्माण करणारे विचार आणि लेखन ही कोणत्याही अर्थाने समाजसेवा ठरत नाही. तरी याबाबत महाराष्ट्रातील जनमानसात शासनाविरुद्ध संताप असून शासनाने हा पुरस्कार देऊ नये. अन्यथा राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय तसेच महाराष्ट्रातील बहुजन स्त्रियांची मानहानी व चारित्र्यहनन होण्यास शासन जबाबदार असेल.
‘जेम्स लेन’ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक लेखन केले. त्या पुस्तकात पुरंदरेचे प्रास्तावनेत सहकार्याबद्दल आभार मानलेले आहेत, ही गंभीर बाब आहे. तसेच, पुरंदरे यांच्या जातीयवादी लिखाणाविरुद्ध कोल्हापूर कोर्टात अब्रूनुकसान भरपाईचा दावा सुरू आहे. असे असतानाही केवळ वाढलेल्या वयाचा विचार करून पुरस्कार देणे गैर आहे.
--
महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुरंदरेंच्या विकृत लिखणाला राजमान्यता मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या विकृतीकरणाला पाठबळ देण्यासारखे आहे. याविषयी स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून यावर मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही.
- नागनाथ कोत्तापल्ले, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती
----
प. बा. सावंत यांचाही विरोध
बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास माजी न्यायमूर्ती प. बा. सावंत यांनीही विरोध दर्शविला आहे. हा छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ तसेच अखिल मराठी जनतेचा व भारतीयांचा अपमान आहे. शासकीय पुरस्कार हे कुठल्याही सरकारची मालमत्ता नसते. ते सर्व जनतेच्या वतीने दिले जातात. जेव्हा बहुमताचा अनादर करून ते दिले जातात तेव्हा त्या पुरस्कारांचे अवमूल्यन होते, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Purandare's 'Maharashtra Bhushan' has been opposed to Nameda, Kottapalene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.