मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या असलेले सुधाराचे संकेत कायम राहिले आणि पाऊस देखील जर सामान्य असेल तर येत्या चार आॅगस्ट रोजी मांडण्यात येणाऱ्या पतधोरणात आणखी किमान पाव टक्क्यांची दर कपात अपेक्षित असल्याचा अंदाज बँक आॅफ अमेरिका आणि मेरिल लिंचने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या तिमाहीत चलनवाढीचा दर आटोक्यात येताना दिसत आहे. तसेच, चालू खात्यातील वित्तीय तूटदेखील नियंत्रणात येताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल मान्सूनच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. सुरुवातीला जरी दमदार पाऊस झाला असला तरी, आता काहीसा ब्रेक घेतला आहे. मात्र, तरी जर पाऊस पुन्हा सामान्य झाला तर त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येईल व त्यामुळेच दर
कपात होण्याची आशा वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
४ आॅगस्ट रोजी पाव टक्का दर कपात शक्य
भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या असलेले सुधाराचे संकेत कायम राहिले आणि पाऊस देखील जर सामान्य असेल तर येत्या चार आॅगस्ट रोजी मांडण्यात येणाऱ्या पतधोरणात आणखी
By admin | Published: June 30, 2015 02:22 AM2015-06-30T02:22:43+5:302015-06-30T02:22:43+5:30