Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्नॅपडील आणि फ्यूचर ग्रुपला मागे टाकत फ्लिपकार्टने केली जबाँगची खरेदी

स्नॅपडील आणि फ्यूचर ग्रुपला मागे टाकत फ्लिपकार्टने केली जबाँगची खरेदी

ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या फ्लिपकार्टच्या युनिट 'मिन्त्रा' आता प्रतिस्पर्धी ऑनलाइन रिटेल कंपनी 'जबाँग'चा ताबा घेणार आहे

By admin | Published: July 26, 2016 10:25 AM2016-07-26T10:25:08+5:302016-07-26T10:25:08+5:30

ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या फ्लिपकार्टच्या युनिट 'मिन्त्रा' आता प्रतिस्पर्धी ऑनलाइन रिटेल कंपनी 'जबाँग'चा ताबा घेणार आहे

Purchasing Jabong by Flipkart, behind Snapdeal and Future Group | स्नॅपडील आणि फ्यूचर ग्रुपला मागे टाकत फ्लिपकार्टने केली जबाँगची खरेदी

स्नॅपडील आणि फ्यूचर ग्रुपला मागे टाकत फ्लिपकार्टने केली जबाँगची खरेदी

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 26-  ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या फ्लिपकार्टच्या युनिट 'मिन्त्रा' आता प्रतिस्पर्धी ऑनलाइन रिटेल कंपनी 'जबाँग'चा ताबा घेणार आहे. दोन्ही कंपन्यांनी करारावर सही केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. जबाँगची खरेदी करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी पसंती दर्शवली होती. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त फ्यूचर ग्रुप, स्नॅपडील तसंच आदित्य बिर्ला ग्रुपच्या मालकीचं अबॉफ या शर्यतीत होतं.मात्र इतरांना मागे टाकत फ्लिपकार्टने जबाँगची खरेदी केली आहे.
 
जबाँगची खरेदी करुन फ्लिपकार्ट ई-कॉमर्स क्षेत्रातील आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न करेल. याआधी फ्लिपकार्टने मिन्त्रा ताब्यात घेऊन फॅशनच्या क्षेत्रातील मोठ्या बाजारपेठेवर ताबा मिळवला आहे.
 
जर्मन इन्क्युबेटर रॉकेट इंटरनेटच्या बॅनरखाली 2012 मध्ये जबाँगची सुरुवात करण्यात आली होती. ऑनलाइन रिटेलिंगमध्ये सुरुवातीला प्रसिद्ध झालेलं ऑनलाइन पोर्टल जबाँगची गेल्या वर्षभरापासून घसरण सुरु आहे. खरेदीत झालेली घट तसंच मॅनेजमेंटमध्ये झालेले बदल घसरण होण्यास कारणीभूत ठरले आहेत. गतवर्षी जबाँगचे सह-संस्थापक अरुण चंद्रा मोहन आणि परवीन सिन्हा यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर संजीव मोहंती यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. 
 

Web Title: Purchasing Jabong by Flipkart, behind Snapdeal and Future Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.