पूर्व फ्लेक्सिपॅक आयपीओनं (Purv Flexipack IPO) शेअर बाजारात दमदार एन्ट्री घेतली आहे. लिस्टिंगमुळे पात्र गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीनं वाढलेत. कंपनीचे शेअर्स मंगळवारी एनएसईवर 266 टक्के प्रीमियमसह 260 रुपयांवर लिस्ट झाले. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 270 रुपये प्रति शेअर आहे.
कंपनीच्या (Purv Flexipack IPO Listing) आयपीओचा प्राइस बँड 70 ते 71 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. दरम्यान, काही वेळातच कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसूली झाली. मजबूत लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्क्यांनी घसरून 247 रुपयांवर आली.
किती होती लॉट साईज?
पूर्व फ्लेक्सिपॅक आयपीओची लॉट साइज 1600 शेअर्सची होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 1,13,600 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. हा IPO 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान खुला होता. कंपनीच्या आयपीओची साईज 40.21 कोटी रुपये होती. हा IPO पूर्णपणे फ्रेश इश्यूवर आधारित होता. कंपनीनं आयपीओद्वारे 56.64 लाख शेअर जारी केले आहेत.
600 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब
कंपनीचा आयपीओ 3 दिवसांच्या कालावधीत 621 पेक्षा अधिक पट सबस्क्राईब झाला. आयपीओच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केला. 29 फेब्रुवारी रोजी एकूण 421 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. त्याच वेळी, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी, आयपीओ अनुक्रमे 59.27 पट आणि 144.71 पट सबक्राईब झाला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)