Lokmat Money > बिझनेस न्यूज > पैसे टाका, साेने घ्या; पहिल्या गाेल्ड ATM चं उद्घाटन, २४ तास सेवा सुरू

पैसे टाका, साेने घ्या; पहिल्या गाेल्ड ATM चं उद्घाटन, २४ तास सेवा सुरू

एटीएममधून साेने खरेदी करण्यासाठी ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 10:01 AM2022-12-07T10:01:26+5:302022-12-07T10:01:41+5:30

एटीएममधून साेने खरेदी करण्यासाठी ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात

Put money in, take it out; Inauguration of the first Gold ATM, 24 hours service | पैसे टाका, साेने घ्या; पहिल्या गाेल्ड ATM चं उद्घाटन, २४ तास सेवा सुरू

पैसे टाका, साेने घ्या; पहिल्या गाेल्ड ATM चं उद्घाटन, २४ तास सेवा सुरू

भारतीयांमध्ये साेन्याप्रति फार आकर्षण असते. सणासुदीला हमखास साेने खरेदी हाेणारच. आता साेने खरेदी आणखी साेपी झाली असून, एटीएममधून साेने विकत घेता येणार आहे. हैदराबादमध्ये देशातील पहिल्या गाेल्ड एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, २४ तास हे एटीएम सुरू राहणार आहे. एका कंपनीने हे एटीएम सुरू केले आहे.

असे काढू शकता साेने
एटीएममधून साेने खरेदी करण्यासाठी ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात. एटीएममध्ये ज्याप्रमाणे कार्ड वापरताे, त्याचप्रमाणे ही यंत्रणा काम करेल. जेवढे साेने विकत घ्यायचे आहे, ते एंटर करावे. तुमच्या कार्डमधून पैसे वळते हाेतील आणि तेवढे साेने बाहेर येईल. 

अबुधाबी येथे २०१० मध्ये जगातील पहिले गाेल्ड एटीएम सुरू करण्यात आले हाेते. त्यापूर्वी फ्रॅंकफर्ट येथे त्याची एका दिवसासाठी चाचणी करण्यात आली हाेती. एटीएममधून मिळणारे साेने नाण्यांच्या स्वरूपात मिळेल. ०.५ ग्रॅम, १, २, ५, १०, २०, ५० आणि १०० ग्रॅम असे पर्याय उपलब्ध आहेत. ही सर्व नाणी २४ कॅरेट साेन्याची आहेत.साेन्याची किंमत लाइव्ह किमतींवर आधारित असेल. दर दहा मिनिटांनी दर अपडेट हाेतील. महत्त्वाचे म्हणजे, साेनेखरेदीसंबंधी असलेल्या कायद्यांचेही पालन या एटीएममध्ये हाेणाऱ्या व्यवहारांमध्ये हाेणार आहे. 

५ किलो सोने गोठवण्याची एटीएमची क्षमता आहे. २४ तासांमध्ये पैसे वळते झाल्यानंतर सोने न मिळाल्यास पैसे परत मिळतील. 

 

Web Title: Put money in, take it out; Inauguration of the first Gold ATM, 24 hours service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं