Aadhaar Card News : आधार कार्ड हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज बनलं आहे. लहान-मोठ्या प्रत्येक कामात आधार कार्डचा वापर केला जातो. सामान्यत: बहुतेक लोकांकडे जाड कागदावरील लॅमिनेटेड आधार कार्ड असतं. पण अशी आधारकार्ड खूप लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुम्हाला चांगलं आणि तुमच्या पॅन कार्डाप्रमाणेच दिसणारं आधार कार्ड घ्यायचं असेल तर तुम्ही यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून पीव्हीसी आधार कार्ड मागवू शकता. जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल.
पीव्हीसी आधार कार्ड ५० रुपयांत मिळणार
यूआयडीएआय लोकांना केवळ ५० रुपयांत पीव्हीसी आधार कार्ड देत आहे. यासाठी तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये खर्च करावे लागतील. या ५० रुपयांमध्ये स्पीड पोस्ट शुल्काचाही समावेश आहे. यूआयडीएआय स्वत: लोकांना पीव्हीसी आधार कार्ड वापरण्याचा सल्ला देत आहे. यूआयडीएआयने लोकांना आपल्या एक्स पोस्टमध्ये पीव्हीसी आधार कार्ड वापरण्याचा सल्ला दिलाय.
कसं मागवाल पीव्हीसी आधार?
- पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी https://uidai.gov.in यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- माय आधार सेक्शनमध्ये जा आणि ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.
- आपला आधार कार्ड क्रमांक एन्टर करा आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.
- रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाका.
- आता तुमच्या पीव्हीसी आधार कार्डची एक कॉपी तुमच्यासमोर येईल.
- आपल्या सर्व माहितीची पडताळणी करा आणि आपली ऑर्डर द्या.
- यानंतर तुम्हाला ५० रुपये भरावे लागतील, त्यानंतर तुमच्या रिक्वेस्टवर पुढील प्रक्रिया केली जाईल.
- ऑर्डर दिल्यानंतर तुमचं पीव्हीसी आधार कार्ड १५ दिवसांच्या आत किंवा १५ दिवसांनंतर तुमच्या घरी येईल. पीव्हीसी आधार कार्ड अनेक सिक्युरिटी फीचर्ससोबत येतं.