Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता PVR INOX मध्ये सिनेमा पाहा! दोन्ही कंपन्यांचे होणार विलिनीकरण; गुंतवणूकदारांवर थेट परिणाम

आता PVR INOX मध्ये सिनेमा पाहा! दोन्ही कंपन्यांचे होणार विलिनीकरण; गुंतवणूकदारांवर थेट परिणाम

मल्टिप्लेक्स क्षेत्रातील ही मोठी घडामोड मानली जात असून, गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 02:38 PM2022-03-28T14:38:11+5:302022-03-28T14:39:08+5:30

मल्टिप्लेक्स क्षेत्रातील ही मोठी घडामोड मानली जात असून, गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे.

pvr and inox announces merger deal know what effect on investors and shares of multiplex firms | आता PVR INOX मध्ये सिनेमा पाहा! दोन्ही कंपन्यांचे होणार विलिनीकरण; गुंतवणूकदारांवर थेट परिणाम

आता PVR INOX मध्ये सिनेमा पाहा! दोन्ही कंपन्यांचे होणार विलिनीकरण; गुंतवणूकदारांवर थेट परिणाम

मुंबई: कोरोना संकटाचा मोठा परिणाम अनेक बड्या कंपन्यांवर, क्षेत्रावर पाहायला मिळाले. अनेक महिन्यांपासून चित्रपट प्रदर्शन बंद असल्यामुळे याचा मोठा परिणाम सिनेमागृहांवर झाल्याचे दिसत आहे. यातील दोन बड्या कंपन्या असलेल्या PVR आणि INOX यांचे विलिनीकरण होणार असल्याचे माहिती मिळाली आहे. विलीनीकरणानंतर या दोन्ही कंपन्यांची एकत्रित नवी कंपनी स्थापन केली जाईल, तिचे नाव पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड असे असेल.

देशातील दोन सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स कंपन्या पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) यांनी विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. पीव्हीआरचे विद्यमान अध्यक्ष अनिल बिजली कंपनीचे नवीन अध्यक्ष असतील, तर संजीव कुमार यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आयनॉक्स समूहाचे चेअरमन पवन कुमार जैन यांना नवीन कंपनीच्या बिगर कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष केले जाणार असून, आयनॉक्सचे सिद्धार्थ जैन यांना नॉन-एक्झिक्युटिव्ह नॉन इंडिपेंडंट डायरेक्टर बनवले जाईल.

गुंतवणूकदारांवर नेमका काय परिणाम होणार?

दोन्ही कंपन्यांनी शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, पीव्हीआरच्या प्रवर्तकांची नवीन कंपनीमध्ये १०.६२ टक्के हिस्सेदारी असेल, तर आयनॉक्सच्या प्रवर्तकांची १६.६६ टक्के हिस्सेदारी असेल. यासोबतच नव्या कंपनीत पुन्हा मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मंडळात १० सदस्य असतील. दोन्ही प्रवर्तकांच्या परिवारासाठी मंडळामध्ये प्रत्येकी दोन जागा असतील. नवीन कंपनीमध्ये, शेअरधारकांना १० आयनॉक्स समभागांच्या बदल्यात ३ पीव्हीआरचे शेअर्स दिले जातील, असे सांगितले जात आहे. 

देशातील सर्वांत मोठी मल्टिप्लेक्स कंपनी होणार

पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड ही दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर तयार झालेली नवीन कंपनी देशातील सर्वात मोठी सिनेमा कंपनी बनेल. सध्या पीव्हीआरकडे ७३ शहरांमध्ये १८१ ठिकाणी ८७१ स्क्रीन आहेत, तर आयनॉक्सकडे देशातील ७२ शहरांमध्ये १६० ठिकाणी ६७५ स्क्रीन आहेत. विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांच्या स्क्रीन्सची संख्या १५०० हून अधिक स्क्रीनवर जाईल.

दरम्यान, कोरोनाच्या काळात गेल्या २ वर्षात लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीला खूप फटका बसला आहे. २०२० मध्ये जवळपास संपूर्ण वर्ष सिनेमागृहे बंद होती. २०२१ मध्येही सिनेमा पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. दुसरीकडे सिनेमाला नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि जी-५ सारख्या सर्व ओटीटी प्रतिस्पर्ध्यांकडून तगडी स्पर्धा मिळत होती. त्यामुळेच या दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरणाची घोषणा केल्याचे बोलले जात आहे.
 

Web Title: pvr and inox announces merger deal know what effect on investors and shares of multiplex firms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.