PVR cinemas Offering Free Movie Tickets : कोरोना काळात जर तुम्हाला लसीचे दोन्ही डोस मिळाले असतील, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे लोकांना घरात राहावे लागत आहे. यामुळे सतत घरात राहून तुम्हाला आता कंटाळा आला असेल. (pvr cinema introduced a great offer during the corona period enjoy popcorn with free tickets)
अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्या सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करण्याची गरज नाही, तर एंटरटेनमेंटची मजाही दुप्पट होऊ शकते. दरम्यान, पीव्हीआर सिनेमाने (PVR cinema) अशा लोकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आला आहे, ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या आहेत. त्या लोकांना पीव्हीआर मोफत सिनेमाची तिकिटे देत आहे. पीव्हीआरने या ऑफरला JAB असे नाव दिले आहे.
जाणून घ्या काय आहे ऑफर?मीडिया रिपोर्टनुसार, पीव्हीआर अशा लोकांसाठी मोफत तिकिटे देत आहे, ज्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तसेच, पॉपकॉर्न देखील त्यात उपलब्ध असेल. 12 ऑगस्टपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल. ही ऑफर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पाँडिचेरी वगळता सर्व चित्रपट आणि सिनेमागृहांवर लागू आहे. ज्याठिकाणी पीव्हीआर सिनेमागृह उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. नवीन ग्राहकांसाठी ऑफर व्यतिरिक्त, पीव्हीआर आपल्या 1.1 कोरटी पीव्हीआर प्रिव्हिलेज ग्राहकांना तिकीट आणि जेवणावरील खर्चांसंबंधी योजना आखत आहे. याचा फायदा कंपनीच्या लॉयल ग्राहकांना होईल.
याठिकाणी बुक करू शकता तिकीटचित्रपट पाहणाऱ्यांना दुसऱ्या तिकिटावरही 150 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ऑफर फक्त मर्यादित काळासाठी आहे. जर तुम्हाला मोफत तिकिटे मिळवायची असतील तर तुम्ही BookMyShow व्यतिरिक्त PVR च्या अधिकृत वेबसाइट, मोबाईल अॅप आणि चित्रपटगृहांवर तुमचे तिकीट बुक करू शकता. दरम्यान, हे सर्व फायदे त्या लोकांसाठी आहेत, ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.