Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींच्या कंपनीत परदेशी कंपनीची मोठी गुंतवणूक, ₹८२७८ कोटींत खरेदी केला हिस्सा

मुकेश अंबानींच्या कंपनीत परदेशी कंपनीची मोठी गुंतवणूक, ₹८२७८ कोटींत खरेदी केला हिस्सा

हा करार अशा वेळी होत आहे जेव्हा अनेक गल्फ वेल्थ फंड भारताच्या रिटेल मार्केटमध्ये भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 01:24 PM2023-08-24T13:24:23+5:302023-08-24T13:24:30+5:30

हा करार अशा वेळी होत आहे जेव्हा अनेक गल्फ वेल्थ फंड भारताच्या रिटेल मार्केटमध्ये भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Qatar company s big investment in Mukesh Ambani reliance retail company bought stake for rs 8278 crore | मुकेश अंबानींच्या कंपनीत परदेशी कंपनीची मोठी गुंतवणूक, ₹८२७८ कोटींत खरेदी केला हिस्सा

मुकेश अंबानींच्या कंपनीत परदेशी कंपनीची मोठी गुंतवणूक, ₹८२७८ कोटींत खरेदी केला हिस्सा

कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (QIA) रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये (RRVL) 8,278 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं बुधवारी ही माहिती दिली. कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी या कंपनीतील सुमारे 1 टक्के भागीदारी खरेदी करणार आहे. हा करार अशा वेळी होत आहे जेव्हा अनेक गल्फ वेल्थ फंड भारताच्या रिटेल मार्केटमध्ये भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. RRVL मधील कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या (QIA) या गुंतवणुकीचं मूल्य 8,278 कोटी रुपये आहे. या गुंतवणुकीसह, क्युआयए RAVL मध्ये ०.९९ टक्के  इक्विटी स्टेक मिळवेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. RRVL अनेक उपकंपन्या आणि सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून भारतातील सर्वात मोठा रिटेल व्यवसाय चालवते. त्यांची देशभरात 18,500 हून अधिक स्टोअर्स आहेत.

काय म्हणाल्या इशा अंबानी?
“आम्ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये गुंतवणूकदार म्हणून क्युआयएचं स्वागत करतो. RRVL ला जागतिक दर्जाची संस्था बनवण्यासाठी आम्ही क्युआयएच्या जागतिक अनुभवाचा आणि मूल्य निर्मितीतील मजबूत रेकॉर्डचा लाभ घेण्यास उत्सुक आहोत," अशी प्रतिक्रिया आरआरव्हिएलच्या संचालक ईशा अंबानी म्हणाल्या.

व्यवसायाचा विस्तार
रिलायन्स रिटेलनं जून तिमाहीत 555 नवीन स्टोअर्स जोडले आहेत. पहिल्या तिमाहीच्या अखेरिस रिलायन्स रिटेलच्या एकूण स्टोअरची संख्या 18,446 होती. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत एकूण स्टोअर्सची संख्या 15,866 होती. अलीकडेच रिलायन्स रिटेलने मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाचं अधिग्रहण पूर्ण केले आहे.

Web Title: Qatar company s big investment in Mukesh Ambani reliance retail company bought stake for rs 8278 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.