Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऐकावं ते नवलंच! SEBIच्या धाडीनंतरही Quant Mutual Fundचा AUM ९४,००० कोटींपार, ऑल टाइम हाय लेव्हलवर

ऐकावं ते नवलंच! SEBIच्या धाडीनंतरही Quant Mutual Fundचा AUM ९४,००० कोटींपार, ऑल टाइम हाय लेव्हलवर

गेल्या महिन्यात फ्रन्ट रनिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर क्वांट म्युच्युअल फंड सातत्यानं (Quant Mutual Fund) चर्चेत आहे. नुकताच फंड हाऊसच्या चीफ फायनान्स ऑफिसरनं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 09:14 AM2024-07-15T09:14:32+5:302024-07-15T09:14:47+5:30

गेल्या महिन्यात फ्रन्ट रनिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर क्वांट म्युच्युअल फंड सातत्यानं (Quant Mutual Fund) चर्चेत आहे. नुकताच फंड हाऊसच्या चीफ फायनान्स ऑफिसरनं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Quant Mutual Fund s AUM crosses Rs 94000 crore all time high despite SEBI crackdown front running issue | ऐकावं ते नवलंच! SEBIच्या धाडीनंतरही Quant Mutual Fundचा AUM ९४,००० कोटींपार, ऑल टाइम हाय लेव्हलवर

ऐकावं ते नवलंच! SEBIच्या धाडीनंतरही Quant Mutual Fundचा AUM ९४,००० कोटींपार, ऑल टाइम हाय लेव्हलवर

गेल्या महिन्यात फ्रन्ट रनिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर क्वांट म्युच्युअल फंड सातत्यानं (Quant Mutual Fund) चर्चेत आहे. नुकताच फंड हाऊसच्या चीफ फायनान्स ऑफिसरनं आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, फंड हाऊसनं हर्षल पटेल यांच्या जागी शशी कटारिया यांची सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, क्वांटनं आपल्या युनिटधारकांना माहिती देत बहुतांश स्कीम्ससाठी असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) आणि नेट असेट व्हॅल्यू (NAV) १२ जुलै २०२४ पर्यंत ऑल टाइम हाय लेव्हलवर पोहोचल्याचं सांगितलं. १२ जुलैपर्यंत फंडाचे एयूएम ९४,००० कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

मेलद्वारे फंड हाऊसची माहिती

क्वांट म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना १३ जुलै रोजी एक मेल पाठवला आहे, ज्यामध्ये फ्रंट रनिंग प्रकरणात सेबीनं केलेल्या चौकशी आणि आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. 'गेल्या तीन आठवड्यांत ६९६ कोटी रुपयांचा नेट आउटफ्लो आणि ८७७ कोटी रुपयांचा नेट इक्विटी आउटफ्लो असूनही फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर आहे. एयूएममध्ये ९४,००० कोटी रुपयांहून अधिकची वाढ फंड हाऊससाठी मैलाचा दगड आहे,' असं त्यांनी गुंतवणूकदारांना केलेल्या ईमेलमध्ये म्हटलंय.

जूनच्या पोर्टफोलिओनुसार क्वांट म्युच्युअल फंडाची असेट अंडर मॅनेजमेंट ९०,६२५ कोटी रुपये होती. मे महिन्याच्या तुलनेत क्वांट योजनांमध्ये एययूएम वाढला आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडात मालमत्तेच्या आधारात सर्वाधिक वाढ दिसून आली, जी जूनमध्ये १,७२४ कोटी रुपयांनी वाढली आणि एकूण एयूएम मे मधील २१,२४२ कोटी रुपयांवरून २२,९६७ कोटी रुपयांवर पोहोचली.

या प्रकरणी टाकलेला छापा

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात सेबीनं फ्रन्ट रनिंग प्रकरणी क्वांट म्युच्युअल फंडावर मोठी कारवाई केली होती. मुख्यालयासह अनेक आस्थापनांवर शोधमोहीम राबवण्यात आली. या काळात बाजार नियंत्रक अधिकाऱ्यांनी अनेक मोबाइल फोन, लॅपटॉप आणि अनेक डिजिटल गॅझेट्स जप्त केले होते.

Web Title: Quant Mutual Fund s AUM crosses Rs 94000 crore all time high despite SEBI crackdown front running issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.