Blinkit AC Delivery : क्विक कॉमर्स कंपन्यांच्या येण्याने अनेक गोष्टी बदलत आहेत. आता एखादी वस्तू बाजारात जाऊन खरेदी करण्याची पद्धत मागे पडत चालली आहे. सर्वकाही १० मिनिटांत घरपोच मिळत आहे. यामध्ये क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिट आघाडीवर आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने प्रत्येकजण कुलर आणि एअर कंडिशनर्स शोधत आहे. याच संधीचा फायदा घेऊन ब्लिंकट कंपनीचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी मोठी घोषणा केली.
१० मिनिटांत एअर कंडिशनरची होम डिलिव्हरी
वास्तविक, ब्लिंकीट एअर कंडिशनरची १० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी करणार आहे. यासंदर्भात सीईओ धिंडसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहिलंय,की "कंपनीने या सेवेसाठी लॉयड इंडियासोबत भागीदारी केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये डिलिव्हरी सुरू झाली आहे. लवकरच इतर शहरांमध्येही सुरू होईल. डिलिव्हरीच्या २४ तासांत इन्स्टॉलेशनचे कामही सुरू होईल."
यंदा एअर कंडिशनरची मागणी वाढणार?
धिंडसा यांनी यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, "एसी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. पण, क्विक कॉमर्स कंपन्यांना जड आणि उच्च किमतीच्या उत्पादनांच्या वितरणात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो." धिंडसा म्हणाले, “आम्ही जानेवारीमध्ये निर्णय घेतला होता की आम्ही एसी विकणार नाही. पण मार्चपर्यंत लोक दिवसातून १५,००० वेळा एसी शोधू लागले. त्यामुळे विचार करावा लागला.
या कंपन्याही झटपट डिलिव्हर करतायेत एसी
क्रोमा सारख्या ई-कॉमर्स आणि इलेक्ट्रॉनिक रिटेल चेनने देखील त्यांची लॉजिस्टिक वाढवली आहे. या कंपन्या आता एका दिवसाच्या आता एसी डिलिव्हर करत आहे. फेब्रुवारीमध्ये, क्रोमाने ३० हून अधिक शहरांमध्ये एसी आणि कुलरसाठी एकाच दिवशी वितरण सुविधा सुरू केली. विजय सेल्सने ही सेवा आधीच सुरू केली होती, ज्यामध्ये ४ वाजण्यापूर्वी ऑर्डर दिल्यास त्याच दिवशी AC आणि कुलर वितरित केले जातात.
वाचा - सरकारकडून गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम बंद; बँकेत जमा झालेल्या तुमच्या सोन्याचे काय होणार?
अॅमेझॉन ऑर्डर केल्याच्या ४८ तासांच्या आत AC आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने देखील वितरित करते. यामध्ये मोफत इन्स्टॉलेशनची सुविधा देखील समाविष्ट आहे. ब्लिंकिटने गेल्या वर्षी कूलरची जलद वितरण सेवा सुरू केली.