बंगळुरू : काेराेना महामारीमुळे भारतातील ई-काॅमर्स कंपन्यांना माेठा फायदा झाला. ऑनलाइन व्यवहार माेठ्या प्रमाणात वाढले. आता या क्षेत्रात भारतातील सर्वात माेठे उद्याेगपती पाऊल ठेवणार आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात चौरंगी स्पर्धा दिसणार आहे.कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन लागले. त्यानंतर लोकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे वाढला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासोबतच किराणा खरेदीही हाेऊ लागली. याकडे मुकेश अंबानी आणि रतन टाटा हे भारतातील दोन मोठे उद्योगपती आकर्षित झाले आहेत. डिजिटल ग्राहकांकडे दोघेही पुढची मोठी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन कंपन्यांचे ऑनलाइन बाजारपेठेत वर्चस्व आहे. त्यांना स्पर्धा देण्यासाठी अंबानी आणि टाटा उद्योगसमूह सज्ज झाले आहेत. टाटा समूहाने ‘बिग बास्केट’ या ऑनलाइन किराणा विक्री करणाऱ्या ॲपमध्ये मोठी गुंतवणूूक करण्याची तयारी केली आहे. सुमारे ७ हजार काेटी रुपयांची ही गुंतवणूक असल्याचे बाेलले जात आहे. यासाेबतच देशभरातील विविध क्षेत्रातील किरकाेळ विक्रत्यांचे जाळे तयार करून एक सुपर ॲप तयार करण्याचीही टाटा समूहाची तयारी आहे. अमेरिकेतील ‘वाॅलमार्ट’साेबतही वाटाघाटी सुरू आहेत.रिलायन्स समूहानेही मोठी तयारी केली आहे. एका फार्मा स्टार्टअपमध्ये काही वाटा खरेदी केला आहे.
- किराणा विक्रीची ऑनलाइन बाजारपेठ सध्या मोठ्या उद्योगसमूहांना खुणावतेय. त्यातही शहरांसह ग्रामीण भागात जम बसविण्यावर यशाचे गणित ठरणार आहे. ही बाजारपेठ मोठी आहे. त्यामूळे 4 ते 5 मोठ्या समूहांना संधी आहे. भविष्यामध्ये या क्षेत्रात चौरंगी स्पर्धा दिसल्यास आश्चर्य राहणार नाही. याचा ग्राहकांनाही फायदा होणार आहे.