कोणत्याही कंपनीच्या शेअर्सना बूस्ट देण्यासाठी एक चांगली डील पुरेशी ठरते. ही गोष्ट Quint Digital Media लिमिटेडच्या बाबतीत अगदी खरी ठरली आहे. शेअर बाजारात लिस्टेड Quint Digital Media शी संबंधित एका कंपनीने, एक अशी डील केली आहे, की जिच्यामुळे त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत रॉकेट स्पीडने वाढली आहे. केवळ दोनच दिवसांत Quint Digital Media च्या शेअर्सची किंमत तब्बल 175 रुपयांपेक्षाही अधिक वाढली आहे.
अशी आहे डील -
खरे तर, गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने (Adani Group) मीडिया व्हेंचर क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (क्यूबीएम) अल्पशी हिस्सेदारी घेतली आहे. पण, अदानी ग्रुप क्यूबीएमसोबत येताच, अमेरिकन कंपनी ब्लूमबर्ग मीडियाने या व्हेंचरपासून स्वत:ला दूर केले आहे. ही एक बिझनेस आणि फायनांससी संबंधित बातम्या देणारी कंपनी असून ब्लूमबर्गक्विंट नावाने डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म चालवते.
सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट -
या डीलनंतर, बुधवारी आणि गुरुवारीही Quint Digital Media च्या शेअर्समध्ये अपर सर्किट दिसून आले. आता या शेअरची किंमत 580 रुपये एवढी आहे. जी 52 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीच्या जवळपास आहे. 52 आठवड्यांचा उच्चांक 589 रुपये एवढा आहे. सध्या, या शेअरची किंमत 580.05 रुपये एवढी आहे. तर गेल्या व्यापारी दिवसात याची किंमत 483.40 रुपये एवढी होती.