Join us  

रघुराम राजन यांची दोन वर्षे पूर्ण

By admin | Published: September 04, 2015 10:03 PM

चलनवाढीविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारण्याची ख्याती असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शुक्रवारी पदाची दोन वर्षे पूर्ण केली.

मुंबई : चलनवाढीविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारण्याची ख्याती असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शुक्रवारी पदाची दोन वर्षे पूर्ण केली. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीबाबत त्यांच्यावर दडपण वाढत चालले आहे. रघुराम गोविंद राजन यांनी ४ सप्टेंबर २०१३ रोजी रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर म्हणून तीन वर्षांसाठी सूत्रे स्वीकारली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर घसरता रुपया सावरणे, चालू खात्यातील तोटा कमी करणे, आर्थिक वृद्धीतील घसरण थांबविणे आदी आव्हाने होती. चलनवाढीचा दर जुलैमध्ये ३.८ टक्क्यांवर आणण्यावर ते यशस्वी झाले.