Join us

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 5:48 AM

नाव आघाडीवर; ब्रेक्झिटच्या अडचणींतून मार्ग काढण्याचे आव्हान

लंडन : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची इंग्लंडच्या बँक आॅफ इंग्लंड या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. बँक आॅफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत राजन यांचे नाव सर्वात पुढे आहे. ब्रेक्झिटमुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था अडचणीत असताना मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदासाठी राजन यांच्या नावाचा विचार होणे, ही महत्त्वाची बाब आहे.

बँक आॅफ इंग्लंड ३२५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली बँक असून, तिचे गव्हर्नरपद लवकरच रिक्त होणार आहे. अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलेले रघुराम राजन ब्रेक्झिटमधून निर्माण झालेल्या अडचणींतून मार्ग काढू शकतील, असे बोलले जात आहे. रघुराम राजन सध्या शिकागो बूथ स्कूल आॅफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत. राजन २00३ ते २00६ या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मुख्य अर्थतज्ज्ञ होते. त्यावेळी त्यांनी जागतिक मंदीचे केलेले भाकित खरे ठरले होते. काही काळातच जगभरात मंदी आली. त्या मंदीत अमेरिकेतील लेहमन ब्रदर्ससारख्या महत्त्वाच्या बँका बुडाल्या. राजन यांनी २0१३ ते २0१६ या काळात गव्हर्नर म्हणून काम पाहिले. बुडित खात्यात गेलेल्या कर्जांमुळे अडचणीत सापडलेल्या बँकांमध्ये आर्थिक शिस्त आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकरघुराम राजन